ब्रिटिश थिऑरिकल भौतिकशास्त्रज्ञ Peter Higgs

Peter Higgs : पीटर हिग्स यांचा जन्म २९ मे १९२९ साली इंग्लंडमध्ये झाला. पीटर हिग्स हे एक ब्रिटिश थिऑरिकल भौतिकशास्त्रज्ञ होते. ते एडनबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापकही होते.

110
ब्रिटिश थिऑरिकल भौतिकशास्त्रज्ञ Peter Higgs
ब्रिटिश थिऑरिकल भौतिकशास्त्रज्ञ Peter Higgs

पीटर हिग्स (Peter Higgs) यांचा जन्म २९ मे १९२९ साली इंग्लंडमध्ये झाला. पीटर हिग्स हे एक ब्रिटिश थिऑरिकल भौतिकशास्त्रज्ञ होते. ते एडनबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापकही होते. एवढेच नाही तर त्यांना भौतिकशास्त्रातील त्यांच्या सबअटॉमीक पार्टीकल्सविषयी सखोल अभ्यासासाठी नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. (Peter Higgs)

१९६४ साली प्रकाशित झालेल्या फिजिकल रिव्ह्यू लेटर्स म्हणजेच पी.आर.एल. मध्ये तीन पेपरपैकी एका पेपरचे लेखक हिग्स हे होते. त्यांनी असं सांगितलं होतं की, ‘इलेक्ट्रोवीक सिद्धांतामध्ये स्पॉंटिन्स समरी ब्रेकिंग इलेमेंट्री पार्टीकल्सच्या वस्तुमानाच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण करू शकते. सामान्यत: W आणि विशेषतः Z बोसोन्सचे स्पष्टीकरण करू शकते.’ या हिग्स मेकॅनिझममुळे हिग्स बोसॉन या नवीन कणाच्या अस्तित्वाचा शोध लागला. (Peter Higgs)

(हेही वाचा- निबंध भोवणार! Pune Porsche Car Accident प्रकरणी बाल न्याय मंडळाच्या सदस्यांची चौकशी होणार)

हिग्स बोसॉनचा शोध हा भौतिकशास्त्रात लावल्या गेलेल्या महान शोधांपैकी एक आहे. २०१२ साली CERN ने लार्ज हॅड्रॉन कोलायडर येथे हिग्स बोसॉनचा शोध जाहीर केला. हिग्स यांच्या या संशोधनासाठी त्यांना २०१३ साली भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. याव्यतिरिक्त हिग्स यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. त्यामध्ये १९८१ साली देण्यात आलेल्या रॉयल सोसायटीच्या ह्युजेस मेडलचाही समावेश आहे. (Peter Higgs)

तसेच भौतिकशास्त्र संस्थेकडून १९८४ साली रदरफोर्ड पदक देण्यात आलं होतं. तर इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स कडून थिऑरिकल फिजिक्समधल्या त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी १९९७ साली डिरॅक मेडल आणि पारितोषिक देण्यात आलं होतं. १९९७ साली युरोपियन फिजिकल सोसायटीचा हाय एनर्जी आणि पार्टीकल फिजिक्स पुरस्कार देण्यात आला होता. (Peter Higgs)

(हेही वाचा- Pench Tiger Reserve ठरला राज्यातील पहिला ‘प्लास्टिक मुक्त’ व्याघ्र प्रकल्प!)

एवढंच नाही तर २००४ साली देण्यात आलेला भौतिकशास्त्रातला वुल्फ पुरस्काराचाही यात समावेश आहे. २००९ साली हिग्स यांना रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचं ऑस्कर क्लेन मेमोरियल लेक्चर मेडल प्रदान करण्यात आलं होतं. २०१० साली थिऑरिकल पार्टीकल्स भौतिकशास्त्रासाठी अमेरिकन फिजिकल सोसायटीकडून जे. जे. साकुराई पुरस्कार देण्यात आला होता. तर २०१२ साली रॉयल सोसायटी ऑफ एडिनबर्ग कडून एक अद्वितीय मेडल आणि २०१५ साली कोपली मेडल प्रदान केलं होतं. हे जगातलं सर्वात जुनं वैज्ञानिक पारितोषिक आहे. (Peter Higgs)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.