Shivaji Maharaj Rajyabhishek : असा झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा!

"काशी की कला जाती, मथुरा की मस्जिद होती, अगर शिवाजी न होते, तो सुन्नत होती सबकी." कवी भूषण यांनी छत्रपतींचं महत्व अशा शब्दांत सांगितलेलं आहे.

539
Shivaji Maharaj Rajyabhishek : असा झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा!

हिंदुराष्ट्राचे सम्राट म्हणून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. “काशी की कला जाती, मथुरा की मस्जिद होती, अगर शिवाजी न होते, तो सुन्नत होती सबकी.” कवी भूषण यांनी छत्रपतींचं महत्व अशा शब्दांत सांगितलेलं आहे. त्यामुळे छत्रपतींचा राज्याभिषेक हा जिहादी राजवट नाकारणार्‍या आणि लाथाडणार्‍या एका हिंदू सम्राटाचा राज्याभिषेक होता. त्यामुळे यास जागतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. (Shivaji Maharaj Rajyabhishek)

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजे ६ जून १६७४ मध्ये राज्याभिषेक करुन घेतला आणि एक असार्वभौम हिंदू राज्याची स्थापना झाली. महाराजांना हा राज्याभिषेक अत्यंत व्यापक आणि भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा प्रसंग आहे. (Shivaji Maharaj Rajyabhishek)

छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. राज्याचा कारभार आणि पदे वाटून दिली. राज्याभिषेकानंतरचे अष्टप्रधान मंडळ पुढील प्रमाणे : (Shivaji Maharaj Rajyabhishek)

१) पंतप्रधान (पेशवा) – सर्वोच्च मंत्रीपद मोरोपंत त्रिंबक पिंगळे

२) पंत अमात्य – रामचंद्र नीळकंठ

३) पंत सचिव सुरणीस – अनाजीपंत दत्तो

४) मंत्री वाकनीस – दत्ताजी पंत त्रिंबक

५) सेनापती सरनौबत – हंबीरराव मोहिते

६) पंत सुमंत (डाबिर) – रामचंद्र त्रिंबक

७) न्यायाधीश – निराजपंत रावजी

८) पंडितराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव)-मोरेश्वर पंडित

(हेही वाचा – भारत सरकारने फ्रान्ससोबत केले मोठे डील; Rafale Fighter विमानांबद्दल दिली ‘ही’ महत्त्वाची बातमी!)

अगदी हिंदू सनातनी पद्धतीने हा सोहळा पार पडला. पहाटे मंत्रोच्चार आणि सर्व हिंदू संस्कारासह कुलदैवतेचे स्मरण करण्यात आले आणि राज्याभिषेकाला प्रारंभ झाला. महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते, गळ्यात फुलांच्या माळा आणि डोक्यावर छत्र धरले गेले. राज्याभिषेकाचे दालन ३२ शुभ चिन्हांनी सजवले गेले होते. ३२ मण सोन्याचे सिंहासन निर्मिले गेले. हिंदूराष्ट्राचे सम्राट छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. खरे तर ते हिंदूंच्या मनाच्या सिंहासनावर केव्हाच विराजमान झाले होते. (Shivaji Maharaj Rajyabhishek)

’शिवराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणांनी सभागृह पवित्र झाला होता. विविध वाद्य आणि तोफांनी आसमंत दणाणून गेला. तिथे औरंगजेबाच्या पायाखालची जमीन सरकली होती. स्वतःला हिंदुस्थानचा बादशाह म्हणवणार्‍या औरंग्याच्या नाकावर टिच्चून हिंदूंचा राजा सिंहासनावर आरुढ झाला. हा राज्याभिषेक सोहळा म्हणजे हिंदू साम्राज्य दिन होय! (Shivaji Maharaj Rajyabhishek)

पुढे मराठ्यांनी जिहादी अतिरेक्यांच्या हातून सत्ता हिसकावून घेतली. सबंध भारतावर मराठ्यांची सत्ता स्थापन झाली. आज आपला भारत स्वतंत्र आहे. यामध्ये मराठी माणसाचे योगदान खूप मोठे आहे. टिळक, सावरकर, चापेकर अशी कितीतरी नावे सांगता येतील. मात्र या सर्वांचे प्रेरणास्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज… अशा पद्धतीने शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाकडे पाहता येईल. (Shivaji Maharaj Rajyabhishek)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.