पुण्यातील (pune porsche accident) दुर्घटना दुर्दैवी आहे. या प्रकरणात तपास योग्य दिशेने सुरू आहे. दोषींना मदत करणाऱ्या २ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे. ब्लड सँम्पल बदलणाऱ्या डॉक्टरांना अटक झाली आहे. कायद्याच्या प्रक्रियेने योग्य ती कारवाई सुरू आहे. जर यात कुणाचा हस्तक्षेप असता, तर कारवाई झालेली दिसली नसती. मग अंजली दमानिया (Anjali Damania) यांचा बोलविता धनी कोण? त्यांचेच कॉल रेकॉर्डिंग तपासण्याची आणि नार्को टेस्ट करण्याची गरज आहे असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी केला आहे. या प्रकरणी उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हा प्रश्न उपस्थित केला आहे.
(हेही वाचा – शिर्डीला जाताय तर, Sainagar Shirdi Railway Station वरील ‘या’ सुविधा तुम्हाला माहिती पाहिजेच!)
सुपारी घेऊन नेत्यांना बदनाम करण्याचा उद्योग
पुण्याच्या अपघात प्रकरणानंतर समाजसेविका अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांवर अनेक आरोप करत त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, डोंबिवली कंपनीत स्फोट, उजनीत बोट बुडाली यासारख्या दुर्घटना गेल्या १०-१५ दिवसांत झाल्या. या दुर्घटनांबाबत अंजली दमानिया संवेदनशील दिसल्या नाहीत. दमानिया यांना नागरिक म्हणून प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. या दुर्घटना घडू नये, यासाठीचे प्रयत्न शासनयंत्रणा करत असते. जाणीवपूर्वक पुण्याच्या घटनेवरून राष्ट्रवादीला आणि आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा उद्योग सुपारी घेऊन काही लोकांनी चालवला आहे, असा आरोप उमेश पाटील यांनी केला.
आपण ग्रामपंचायतीत तरी निवडून आलात का?
या पत्रकार परिषदेत बोलतांना उमेश पाटील म्हणाले की, राज्यात १ मुख्यमंत्री, २ उपमुख्यमंत्री आहेत. पुण्याच्या दुर्घटनेनंतर गृहमंत्री असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत पुण्याच्या प्रकरणावर कारवाईचे आदेश दिले. त्याच वेळी मंत्रालयात दुष्काळाबाबत आणि पाणी टंचाईबाबत अजित पवार अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत होते. मतदान संपल्यानंतर अनेक नेते काश्मीरपासून जगभरात विश्रांती घ्यायला गेले असताना मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवार मंत्रालयात सकाळी ८ वाजता काम करत होते. ३५ वर्ष महाराष्ट्र अजित पवार निवडून येतात. तुम्हाला कुणी निवडून दिलंय? आपण ग्रामपंचायतीत तरी निवडून आलात का? एखादी निवडणूक लढवून आपल्या पाठीशी किती लोक आहेत, हे तपासा, असा सल्लाही उमेश पाटील यांनी दिला आहे.
हेही पहा –