Marathi Actress : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रभावी नायिका कोण आहेत?

260
Marathi Actress : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रभावी नायिका कोण आहेत?

मराठी चित्रपटसृष्टीला अनेक दशकांचा समृद्ध इतिहास आहे. भारतीय चित्रपटसृष्टी सुरु करणारी व्यक्ती मराठीच होती. विशेष म्हणजे हिंदी सिनेसृष्टीचं महत्वाचं स्थान हे महाराष्ट्रातील मुंबई आहे. अनेक वर्षांत असंख्य प्रतिभावान अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर स्थान बळकट केले आहे. एक काळ होता जेव्हा महिलांनी चित्रपटांत काम करणे हलक्या दर्जाचे मानले जायचे. मात्र आता हा प्रतिष्ठित उद्योग आहे. (Marathi Actress)

चला तर काही उल्लेखनीय अभिनेत्रींच्या जीवनाचा आणि त्यांच्या योगदानाचा शोध घेऊया, जाणून घेऊया कोण आहेत मराठी चित्रपटसृष्टीतील प्रभावी नायिका… (Marathi Actress)

दुर्गा खोटे : 

एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मराठी चित्रपट नवजात अवस्थेत होता तेव्हा दुर्गा खोटे या अग्रगण्य अभिनेत्रीचा उदय झाला. सामाजिक बंधने असूनही, त्यांनी अडथळ्यांवर मात केली आणि स्वतःला आघाडीची अभिनेत्री म्हणून सिद्ध केले. त्यांच्या दमदार अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीतील स्त्रियांच्या कारकिर्दीचा पाया भक्कम झाला. (Marathi Actress)

सोनाली कुलकर्णी :

सोनाली कुलकर्णी हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रमुख नाव आहे. मोठी सोनाली आणि छोटी सोनाली अशा दोन्ही अभिनेत्रींनी आपली छाप पाडली आहे. त्यांच्या मनमोहक अभिनयाने आणि मनमोहक व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मोठ्या सोनाली कुलकर्णीने अभिनयाच्या जादूने आणि आपल्या विशिष्ट आवाजाने वेड लावले. तर छोट्या सोनालीने आपल्या अप्सरा लूकने आणि नृत्याने रसिकांच्या मनावर राज्य केलं. (Marathi Actress)

अमृता खानविलकर :

अमृता खानविलकर ही एक अत्यंत प्रतिभावान अभिनेत्री आहे. अभिनय आणि सौंदर्य यांचा उत्कृष्ट मिलाफ आहे. गोलमाल, कट्यार काळजात घुसली, राझी सारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये ती झळकली. अमृता विविध पात्र सहजतेने निभावते. मराठी प्रमाणे हिंदीतही तिने झेंडा रोवला आहे. (Marathi Actress)

(हेही वाचा – Pune Porsche Case : ससुन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले सक्तीच्या रजेवर)

सई ताम्हणकर :

या पिढीची आणखी एक दमदार अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर… ती एक अष्टपैलू आणि कुशल अभिनेत्री आहे. दुनियादारी, हंटर सारख्या चित्रपटांतून तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांना भुरळ घालणारी सई मराठी चित्रपटसृष्टीवर कायमची छाप सोडली आहे आणि आता ती हिंदीतही आपला करिष्मा दाखवत आहे. (Marathi Actress)

श्रीया पिळगांवकर :

२०१३ मध्ये तिचे वडील सचिन पिळगावकर यांच्या ’एकुलती एक’ या मराठी चित्रपटातून श्रीयाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. २०१६ मध्ये जेव्हा तिने मनीष शर्माच्या फॅन या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा तिला मोठे यश मिळाले. ॲमेझॉन प्राइम इंडियावरील २०१८ च्या मिर्झापूर वेबसिरीजमध्ये स्वीटी गुप्ताची भूमिका श्रीयाने साकारली होती आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. अतिशय वेगळं सौंदर्य आणि वास्तववादी अभिनयासाठी ती ओळखली जाते. (Marathi Actress)

प्रिया बापट : 

प्रिया बापटने २००२ मध्ये चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘भेट’ या मराठी चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केले. गच्ची, पिंपळ आणि आम्ही दोघी हे तिचे मराठी चित्रपट चालले. २००८ मध्ये, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या मराठी चित्रपटातून मुख्य भूमिकेत पदार्पण केले. टाइम प्लीज, हॅप्पी जर्नी यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये तिला अभिनय दाखवण्याची संधी मिळाली. मायानगरी-सिटी ऑफ ड्रीम्स या हॉटस्टारवरील वेबसीरिजमध्ये ती प्रमुख भूमिकेत होती आणि यासाठी तिच्या अभिनयाची प्रशंसा झाली. (Marathi Actress)

तेजस्विनी पंडित : 

तेजस्विनी पंडितने २००४ मध्ये केदार शिंदेच्या अगं बाई अरेच्च्या या विनोदी मराठी चित्रपटातून पदार्पण केले. तसेच तिने तुझं नी माझं घर श्रीमंताचं, एकाच ह्या जन्मी जणू आणि १०० डेज यांसारख्या अनेक मराठी टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. १०० डेज मध्ये अभिनयासह आपल्या सौंदर्याने तिने रसिकांना घायाळ केले. २०१० मध्ये अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित मी सिंधुताई सपकाळ या मराठी चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तेजस्विनीला अनेक पुरस्कार आणि नामांकने मिळाली. अलीकडेच तिने आदिपुरुष या बिग बजेट चित्रपटात शुर्पणखेची भूमिका केली होती. (Marathi Actress)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.