भारत नौदलासाठी (Indian Navy) फ्रान्सकडून 26 राफेल-एम लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार करणार आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी फ्रान्स सरकार आणि डसॉल्ट कंपनीचे अधिकारी भारतात येणार आहेत. ते या करारावर संरक्षण मंत्रालयाच्या करार वाटाघाटी समितीशी चर्चा करतील. फ्रान्स राफेल-एम जेट्ससह शस्त्रे, सिम्युलेटर, क्रूसाठी प्रशिक्षण आणि लॉजिस्टिक सपोर्ट देखील देईल. संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी होणाऱ्या बैठकीत नौदलाचे अधिकारीही सहभागी होणार आहेत.
(हेही वाचा Jitendra Awhad यांच्याकडून डॉ. आंबेडकरांचा अवमान; सर्व स्तरातून होतोय निषेध; फौजदारी कारवाईची मागणी)
INS विक्रांतवर तैनात केले जातील
नौदलासाठी (Indian Navy) खरेदी केली जाणारी 22 सिंगल सीट राफेल-एम जेट आणि 4 डबल ट्रेनर सीट राफेल-एम जेट्स चीनचा मुकाबला करण्यासाठी हिंदी महासागरात तैनात केली जातील. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान या कराराची पहिली माहिती समोर आली होती. यानंतर, संरक्षण मंत्रालयाने विनंती पत्र जारी केले, जे डिसेंबर 2023 मध्ये फ्रेंच सरकारने स्वीकारले. यापूर्वी सप्टेंबर 2016 मध्ये 59 हजार कोटी रुपयांच्या मेगा डील अंतर्गत भारताने हवाई दलासाठी फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी केली होती. यावेळी भारत राफेल-एम विमान खरेदी करत आहे. राफेल एम लढाऊ विमाने खास सागरी भागात हवाई हल्ल्यांसाठी तयार करण्यात आली आहेत. ते प्रथम स्वदेशी विमानवाहू जहाज INS विक्रांतवर तैनात केले जातील. राफेल एम हे खास सागरी भागात हवाई हल्ल्यांसाठी तयार करण्यात आले. राफेलची ‘एम’ आवृत्ती भारतात सध्या असलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या तुलनेत प्रगत आहे. INS विक्रांत वरून उड्डाण करण्यासाठी स्की जंपिंग हे अधिक शक्तिशाली इंजिन असलेले लढाऊ विमान आहे. याला ‘शॉर्ट टेक ऑफ बट अरेस्टर लँडिंग’ म्हणतात. अगदी खालच्या ठिकाणीही उतरता येते.
Join Our WhatsApp Community