- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मलबार हिल जलाशयाची (Marbar Hill Reservoir) अंतर्गत पाहणी रुरकी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आय. आय. टी) (I. I. T) प्राध्यापकांमार्फत सोमवार, ०३ जून २०२४ आणि मंगळवार, ०४ जून २०२४ रोजी करण्याचे नियोजित आहे. त्या अनुषंगाने मलबार हिल जलाशयाचा कप्पा क्रमांक १ आणि २ टप्प्या-टप्प्याने रिक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारी ३ जून २०२४ ते मंगळवारी ४ जून २०२४ या कालावधीत शहर भागातील ए, सी, डी, जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील काही भागांच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार आहे. (Marbar Hill Reservoir)
मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. मलबार हिल जलाशयाच्या (Marbar Hill Reservoir) कामाच्या पुनर्विलोकन करण्याकरीता स्थापन केलेल्या आधीच्या विशेषज्ञ समितीने प्रस्तुत केलेल्या अहवालांचे विश्लेषण करण्यासाठी आणि मलबार टेकडी जलाशयातून मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा बाधित न करता जलाशयाच्या कामाची योग्य कार्यपद्धती सुचविण्याकरिता महानगरपालिकेतर्फे रुरकी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय. आय. टी) (I. I. T) या स्थापत्य अभियांत्रिकीतील मान्यताप्राप्त संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. (Marbar Hill Reservoir)
(हेही वाचा- Jumbo Mega Block News : येत्या विकेन्डला लोकलच्या ९३० फेऱ्या रद्द, रेल्वे म्हणते वर्क फ्रॉम होम द्या)
या कामामुळे काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी राहिल. पाणीकपातीदरम्यान जलाशयातील पातळी लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास विभागवार पाण्याच्या वेळेत बदल करण्यात येईल. संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. (Marbar Hill Reservoir)
त्या कपात केली जाणाऱ्या भागांची माहिती. पुढीलप्रमाणे आहे-
ए विभाग – (सोमवार, दिनांक ०३.०६.२०२४ रोजी सकाळी ८.०० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत)
१) कफ परेड व आंबेडकर नगर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ११.२० ते दुपारी ०१.४५ ) (पाणीपुरवठा बंद राहील)
२) नरिमन पॉईंट व जी. डी. सोमाणी (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी ०१.४५ ते दुपारी ०३.०० ) (पाणीपुरवठ्यात ५० टक्के कपात)
३) मिलीटरी झोन (२४ तास पाणीपुरवठा ) (पाणीपुरवठ्यात ३० टक्के कपात)
सी विभाग – (सोमवार, दिनांक ०३.०६.२०२४ रोजी सकाळी ८.०० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत)
मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘ए’ विभागातील सर्व क्षेत्र (उपरोक्त विभाग वगळून) (पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात)
डी विभाग – (सोमवार, दिनांक ०३.०६.२०२४ रोजी सकाळी ८.०० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत)
१) पेडर रोड (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी ०१.०० ते रात्री १०.३० ) (पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात)
२) मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘डी’ विभागातील सर्व क्षेत्र (उपरोक्त विभाग वगळून) (पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात)
जी उत्तर व जी दक्षिण विभाग – (सोमवार, दिनांक ०३.०६.२०२४ रोजी सकाळी ८.०० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत) जी उत्तर व जी दक्षिण विभागातील थेट पाणीपुरवठा होणारे सर्व विभाग (पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात)
ए विभाग – (मंगळवार, दिनांक ०४.०६.२०२४ रोजी सकाळी ८.०० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत)
मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘ए’ विभागातील सर्व क्षेत्र (पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात)
सी विभाग – (मंगळवार, दिनांक ०४.०६.२०२४ रोजी सकाळी ८.०० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत) मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘सी’ विभागातील सर्व क्षेत्र (पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात)
डी विभाग – (मंगळवार, दिनांक ०४.०६.२०२४ रोजी सकाळी ८.०० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत)* मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘डी’ विभागातील सर्व क्षेत्र (पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात)
जी उत्तर व जी दक्षिण विभाग – (मंगळवार, दिनांक ०४.०६.२०२४ रोजी सकाळी ८.०० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत)* जी उत्तर व जी दक्षिण विभागातील थेट पाणीपुरवठा होणारे सर्व विभाग (पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community