“ये बाबुराव का स्टाईल है” असं म्हणणार्‍या Paresh Rawal यांचा आज वाढदिवस. वाचा ही खास माहिती

Paresh Rawal : परेश रावल हे एक प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि चित्रपट निर्माते आहेत.

158
"ये बाबुराव का स्टाईल है" असं म्हणणार्‍या Paresh Rawal यांचा आज वाढदिवस. वाचा ही खास माहिती

परेश रावल (Paresh Rawal) यांचा जन्म ३० मे १९५५ साली एका गुजराती कुटूंबात मुंबई येथे झाला. परेश रावल (Paresh Rawal) हे एक प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि चित्रपट निर्माते आहेत. याव्यतिरिक्त ते राजकारणातही सक्रिय आहेत. आतापर्यंत त्यांनी दोनशे चाळीसपेक्षा जास्त हिंदी चित्रपटांत काम केलं आहे. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामांसाठी त्यांना अनेक पुरस्कारही देण्यात आले आहेत. (Paresh Rawal)

(हेही वाचा- Marbar Hill Reservoir : शहर भागात येत्या सोमवारी आणि मंगळवारी पाणी कपात)

१९९४ साली त्यांना ‘वो चोकरी’ आणि ‘सर’ या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला. पुढे त्यांनी चित्रपटात साकारलेल्या नकारात्मक भूमिकेसाठी त्यांना पहिला फिल्म फेअर अवॉर्ड मिळाला होता. त्यानंतर त्यांनी केतन मेहता यांचा ‘सरदार’ नावाच्या चित्रपटात सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रमुख भूमिका साकारली होती. या भूमिकेने परेश रावल (Paresh Rawal) यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवून दिली. (Paresh Rawal)

२०१४ साली परेश रावल (Paresh Rawal) यांना त्यांच्या मनोरंजन क्षेत्रातल्या योगदानासाठी भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. त्याच वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये परेश रावल हे गुजरातच्या अहमदाबाद पूर्व विभागातून भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले होते. (Paresh Rawal)

(हेही वाचा- Election Commission: येत्या ४८ तासांत आचारसंहिता शिथील होणार ? आयोग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत)

अर्जुन, नाम, शिवा, मोहरा, तमन्ना, चायना गेट, ऐतराज, टेबल नंबर २१ आणि जिलाह गाझियाबाद या चित्रपटांत साकारलेल्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी परेश रावल यांचं विशेष कौतुक करण्यात आलं होतं. (Paresh Rawal)

याव्यतिरिक्त त्यांनी रूप की रानी चोरों का राजा, कब्जा, किंग अंकल, राम लखन, दौड, बाजी यांसारख्या अनेक चित्रपटांत वेगवेगळ्या नकारात्मक भूमिका साकारल्या. पुढे त्यांनी अनेक चित्रपटांत विनोदी पत्राच्या भूमिकाही साकारल्या. त्यांचंही लोकांनी खूप कौतुक केलं. त्यांपैकी त्यांची हेरा फेरी या चित्रपटातली बाबुराव नावाची भूमिका प्रचंड गाजली होती. उरी: द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटात त्यांनी अजय डोवाल यांची महत्वाची भूमिका साकारली होती. परेश रावल हे एक उत्कृष्ठ चरित्र अभेनेते म्हणून ओळखले जातात. (Paresh Rawal)

(हेही वाचा- Bhavesh Bhinde : भिंडेच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ, भिंडेचे मासिक उत्पन्न कोटींच्या घरात)

परेश रावल (Paresh Rawal) यांनी क्षण क्षणं, मणी, मनी मनी, गोविंदा गोविंदा, रिक्षावोडू, बावागारु बागुन्नारा या तेलगू भाषेतल्या हिट चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे ते तेलगू चित्रपट सृष्टीमध्येही आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले. (Paresh Rawal)

१० सप्टेंबर २०२० साली भारतीय राष्ट्रपतींनी NSD म्हणजेच नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाचे चीफ म्हणून परेश रावल (Paresh Rawal) यांना नियुक्त केलं. (Paresh Rawal)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.