‘ऑल आइज ऑन रफा’ (All Eyes On Rafah) ही पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यूजर्स इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर स्टोरीज आणि पोस्ट्सवर शेअर करत आहेत. यासोबतच अनेक सेलिब्रिटीही या मोहिमेत सामील झाले आहेत. यापार्श्वभुमीवर एक्स या ट्विटर हँडलवर बायकॅाट बॉलीवूड (BoycottBollywood) हे हॅशटॅग व्हायरल होत आहे. (BoycottBollywood)
ट्रोलिंगचा सामना
दक्षिण गाझा पट्टीतील रफाह या शहरामधील नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे सेलिब्रिटींनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. अभिनेत्यांव्यतिरिक्त, क्रिकेटर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने देखील गाझामधील पॅलेस्टिनींना समर्थन देत एक पोस्ट केली. तथापि, तिला X वर तीव्र ट्रोलिंगचा सामना करावा लागला. काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराविरुद्ध भूमिका न घेतल्याबद्दल नेटिझन्सनी तिच्यावर टीका केली. यानंतर पोस्ट रितिकाने हटवली. (BoycottBollywood)
‘ऑल आइज ऑन राफा’ म्हणजे काय?
‘ऑल आयज ऑन राफा’ ही एक मोहीम आहे जी जगभरातील लोकांचे लक्ष इस्रायली सैनिकांकडून गाझा शहरावर सुरू असलेल्या हल्ल्याकडे वेधून घेते. गाझामध्ये सैनिक जमिनीवर हल्ले करत आहेत, ज्यात हजारो लोक मारले गेले आहेत. वाढता तणाव आणि दाट लोकवस्तीच्या रफाह शहरात इस्रायली सैन्याने केलेल्या जमिनीवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, ‘ऑल आयज ऑन राफा’ हे ट्रेंड बॉलीवूड व्यक्तींनी उचलून धरले आहे. (BoycottBollywood)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community