Anurag Thakur पाचव्या विजयासाठी मैदानात; काँग्रेसपुढे पाच समस्यांचे आव्हान

181
Anurag Thakur पाचव्या विजयासाठी मैदानात; काँग्रेसपुढे पाच समस्यांचे आव्हान
Anurag Thakur पाचव्या विजयासाठी मैदानात; काँग्रेसपुढे पाच समस्यांचे आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा ‘ब्लू आइड बॉय’ ज्यांना म्हटलं जातं ते माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) गेल्या 20 वर्षांपासून लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस (Congress) धुव्वा उडवित आले आहेत. आता काँग्रेसचे पाचव्यांदा पानीपत करण्याचा इरादा घेवून ते मैदानात उतरले आहेत. (Anurag Thakur)

लोकसभेची निवडणूक (Lok Sabha election 2024) अंतिम टप्प्यात पोहचली आहे. शुक्रवार (दि. 1 जून) रोजी सातव्या टप्प्यासाठी मतदान पार पडेल. (4 जूनला) निकाल आहे. सातव्या टप्प्यात सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 57 जागांवर निवडणूक होणार आहे. (Anurag Thakur)

(हेही वाचा- Marbar Hill Reservoir : शहर भागात येत्या सोमवारी आणि मंगळवारी पाणी कपात)

याच सातव्या टप्प्यात डोंगराचा प्रदेश हिमाचल प्रदेशातील सर्व चारही जागावर मतदान होणार आहे. यातील हमीरपूर मतदारसंघ राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी खूप महत्वाचा आहे. कारण, येथून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर पाचव्यांदा जिंकण्यासाठी मैदानात उतरले आहेत. (Anurag Thakur)

याशिवाय, हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) विधानसभेच्या सहा जागांवर पोटनिवडणूक होत आहे. यातील एकटया हमीरपूर लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या चार जागा आहेत. यामुळे भाजपा (BJP) आणि काँग्रेससह (Congress) अन्य राजकीय पक्षांनी सुध्दा हमीरपूरवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. (Anurag Thakur)

(हेही वाचा- Pune Porsche Accident: ‘बाळा’ची आई घरातून बेपत्ता; पोलिस घरी पोहोचल्यावर मिळालं वेगळंच उत्तर!)

मुख्यमंत्री सुखविंदर सखू (Sukhwinder Sakhu) आणि उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री (Mukesh Agnihotri) यांनी हमीरपूर आणि उना जिल्ह्यांमध्ये प्रचाराची मालिका लावली आहे. तर दुसरीकडे, अनुराग ठाकूर त्यांच्या कामामुळे स्वत:ला मजबूत समजतात. (Anurag Thakur)

हिमाचल प्रदेशात हमीरपूरशिवाय काँग्रेसपुढे (Congress) चार आणखी वेगळे आव्हान आहेत. यामुळे मुख्यमंत्री सुक्खू येथे तळ ठोकून आहेत. खुद्द मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू (Sukhwinder Sakhu) बुधवारी नादौनमध्ये होते. निवडणुकीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री सखू आणि उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री (Mukesh Agnihotri) यांनी हमीरपूर आणि उना जिल्ह्यांचे अनेक दौरे केले आहेत. (Anurag Thakur)

(हेही वाचा- Crime News: भुसावळमध्ये धावत्या कारवर गोळीबार! माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या)

दुसरीकडे, अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांना आतापर्यंत केलेल्या कामावर विश्वास आहे. हमीरपूर लोकसभा (Hamirpur Lok Sabha) क्षेत्रातील कुटलैहड, गाग्रेट, बडसर आणि सुजानपूर या विधानसभेच्या चार मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. लोकसभेची जागा जिंकण्यासाठी भाजपाही (BJP) पूर्ण प्रयत्न करत आहे. दोन्ही पक्षांनी आपली पूर्ण ताकद प्रचारात लावली आहे. (Anurag Thakur)

हे मुख्य मुद्दे आहेत

  • उना-हमीरपूर रेल्वे मार्ग.
  • मेडिकल कॉलेज हमीरपूरच्या बांधकामाचे श्रेय घेण्यासाठी युद्ध, बांधकाम अपूर्ण
  • काँग्रेसच्या जाहीरनाम्यात अल्पसंख्याकांच्या आरक्षणाचा उल्लेख आहे.

(हेही वाचा- Ravindra Dhangekar यांच्या अडचणीत वाढ! कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागण्याची शक्यता)

स्टार प्रचारकांनी रॅलीही काढल्या

भाजपाच्या (BJP) वतीने गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची उना जिल्ह्यात स्टार प्रचारक म्हणून सभा घेतली आहे. याच जिल्ह्यात काँग्रेसच्या (Congress) राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी रॅलीच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना घेरले आहे. प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी बडसर, हमीरपूर येथे रोड शो केला, तर भाजपाचे स्टार प्रचारक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आज रॅली काढणार आहेत. (Anurag Thakur)

हमीरपूरमधील मतदार

हमीरपूरमध्ये 14,32,636 मतदार आहेत. यामध्ये 7,15,681 पुरुष, 7,16,940 महिला, 15,514 अपंग आणि 15 तृतीय लिंग आहेत. सेवा मतदार 23,455, 18-19 वयोगटातील 43,034 आणि 20-29 वयोगटातील 2,61,433 मतदार आहेत. 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 18,172 आहे. (Anurag Thakur)

(हेही वाचा- Lok Sabha Elections 2024 पंतप्रधान मोदींनी प्रथमच मतदारांना लिहिले पत्र!)

अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांचा सामना काँग्रेसचे माजी आमदार सतपाल रायजादा यांच्याशी आहे. दोघांमध्ये अटीतटीची लढत बघायला मिळत आहे. ९३ टक्के ग्रामीण लोकसंख्या असलेल्या या मतदारसंघात ९५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या हिंदूंची आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, हिंदू लोकसंख्येपैकी 23.75 टक्के दलित आणि 1.46 टक्के अनुसूचित जमाती आहेत. (Anurag Thakur)

1998 पासून हा मतदारसंघ भाजपाच्या (BJP) ताब्यात आहे. 10 वेळा भगवा फडकला आहे. अशात, भाजपाचा (BJP) पराभव करून हमीरपूर ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसला (Congress) तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मोदींनी कलम 370 आणि राम मंदिराचे आश्वासन पूर्ण करून देशाचा अभिमान वाढवला आहे. ही निवडणूक भविष्याची निवडणूक आहे. आमच्या अनेक पिढ्यांनी अटलबिहारी वाजपेयींना पाहले आहे. आता मोदीजी आमचे नेते आहेत, असेही अनेकाचे मत आहे. (Anurag Thakur)

(हेही वाचा- BoycottBollywood: बॉयकॉट बॉलीवूड पुन्हा ट्रेंडिंग का?)

भाजपाचे (BJP) खासदार आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी प्रचाराचा ससेमीरा लावला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री उशीरापर्यंत ते प्रचारात असतात. ते समीरपूरला राहतात. येथील घरी सकाळी पुजा—पाठ केल्यानंतर त्यांनी आई-वडिलांचा आशीर्वाद घेतात. गळयांत माताचा दुपट्टा घातला की निघून पडतात प्रचाराला. (Anurag Thakur)

ते कार्यकत्र्यांशी पहाडी भाषेत संवाद साधतात. ‘औँ निकली गई घरे ते तुसाँ प्रपरिया राख’ अर्थात मी घराबाहेर पडलो, तुम्ही तयारी ठेवा. (Anurag Thakur)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.