मुंबईतील अतिशय प्रसिद्ध व प्रतिष्ठित गुरू नानक खालसा काॅलेज (Khalsa College), माटुंगा येथे २०१४ साली कॉलेज प्रवेश प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण वसंत उटीकर यांनी उघडकीस आणले होते. त्यावेळी पहिल्यांदाच मुख्याध्यापक व स्विय सहाय्यक हे भ्रष्टाचारात रंगेहाथ पकडले गेले होते. मुंबईतील महाविद्यालय इतिहासात हे एवढे मोठे पहिलेच प्रकरण होते. (Khalsa College)
सदर प्रकरणात सबळ पुरावे समोर होते व पोलिसांकडून सादर केले गेले होते. सदर प्रकरण हे त्यावेळी संपूर्ण भारतात प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजलेले होते. त्यावेळी प्रवीण दीक्षित हे मुंबईचे एसीबी प्रमुख होते. तसेच विश्वास नांगरे पाटील हेही त्यावेळी एसीबी कार्यालयात कार्यरत होते. या दोन्ही मान्यवरांनी वसंत उटीकर यांचा त्यावेळी एसीबी कार्यालयात छोटेखानी सत्कारही केलेला होता व त्यांना तसे प्रशस्ती पत्रही दिलेले होते. (Khalsa College)
(हेही वाचा – BoycottBollywood: बॉयकॉट बॉलीवूड पुन्हा ट्रेंडिंग का?)
हे प्रकरण २०१४ पासून न्यायालयात प्रलंबित आहे. सदर प्रकरणात १० वर्षाचा प्रदिर्घ कालावधी उलटून गेला तरी कोर्टाचा निकाल अद्यापही लागलेला नाही. ज्यांनी गुन्हा केलेला आहे ते आरोपी अद्यापही मोकाट आहेत. याबाबत वसंत उटीकर अतिशय तीव्र खेद व्यक्त करतात. (Khalsa College)
अशा संवेदनशील महाविद्यालय भ्रष्टाचार प्रकरणात वर्षानुवर्षे न्याय मिळत नसेल, तर तक्रारदार तरी पुढे कसे येतील. आणि अशा प्रकारे केवळ शासनाची प्रशस्ती पत्रे मिळून कोणता उद्देश साध्य होईल? त्यामुळे अशा प्रशस्ती पत्राची खरीच समाजात पत आहे का? असा प्रश्न निर्माण होतो आहे. या प्रकरणाच्या अंतिम निकालाबाबत कोणी न्यायालयीन जाणकार, तज्ञ, अभ्यासू मला मार्गदर्शन करेल का? असा प्रश्न अतिशय व्यथित होऊन आज वसंत उटीकर हे विचारीत आहेत. (Khalsa College)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community