Maharashtra Legislative Council Elections : MNS राज ठाकरे महायुतीतून बाहेर पडले?

511
Maharashtra Legislative Council Elections : MNS राज ठाकरे महायुतीतून बाहेर पडले?
Maharashtra Legislative Council Elections : MNS राज ठाकरे महायुतीतून बाहेर पडले?
  • सुजित महामुलकर

लोकसभा निवडणुकीचा निकाल तोंडावर असताना, राज्यातील विधान परिषदेच्या चार जागांसाठी राजकीय पक्षांमध्ये चूरस सुरू झाली आहे. मुंबई पदवीधर मतदार संघातून भाजपाकडून (BJP) ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार आणि कोकण पदवीधर मतदार संघासाठी निरंजन डावखरे यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. (Maharashtra Legislative Council Elections)

४ जूननंतर बैठका..

महायुतीचे (Mahayuti) घटक पक्ष असलेल्या शिवसनेचे (ShivSena) डॉ दीपक सावंत यांच्या नावाची चर्चा मुंबई पदवीधर मतदार संघासाठी होत असून मनसेचे अभिजीत पानसे यांचे नाव कोकण पदवीधर मतदार संघासाठी जाहीर झाले आहे. याबाबत भाजपाच्या (BJP) एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की मनसेशी झालेली युती ही केवळ लोकसभा निवडणुकीपूरती होती विधान परिषदेसाठी अद्याप कोणतीही बोलणी झालेली नाहीत. त्यामुळे मनसे (MNS) आता लोकसभेनंतरही विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजपासोबत (BJP) महायुतीत राहणार की पुन्हा आपली वेगळी चूल मांडणार, याबाबत अजूनही स्पष्टता नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यासंदर्भात लोकसभा निवडणूक निकालानंतर म्हणजेच ४ जूननंतर बैठकांचे सत्र सुरू होण्याची शक्यता आहे.  शिवसेना उबाठाने महाविकास आघाडीत पुन्हा एकदा परस्पर उमेदवार जाहीर केल्याने तिकडेही गोंधळाचे चित्र आहे. (Maharashtra Legislative Council Elections)

(हेही वाचा- Rafah चे समर्थन करणाऱ्या बॉलिवूडकरांना क्रिकेटर राहुल तेवतियांचे सडेतोड उत्तर; म्हणाले…)

कोण होतंय निवृत्त?

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून बुधवार, २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. शिवसेना उबाठाचे विलास पोतनीस, भाजपाचे (BJP) निरंजन डावखरे पदवीधर मतदार संघातून तर किशोर दराडे आणि कपिल पाटील हे शिक्षक मतदार संघातून निवडून आलेले आमदार ७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे आयोगाने २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.  (Maharashtra Legislative Council Elections)

शिक्षक मतदारसंघाची संख्या..

शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात मुंबई मतदारसंघात २८ मे २०२४ पर्यंत एकूण मतदारसंख्या १५,९१९ इतकी आहे. यामध्ये मुंबई शहर २,७४८ मतदारसंख्या तर मुंबई उपनगरमध्ये १३,१७१ इतकी मतदारसंख्या आहे. २०१८ मध्ये मुंबई मतदारसंघात एकूण मतदार संख्या  १०,१७० इतकी होती.  नाशिक मतदार संघात एकूण मतदारसंख्या ६६,५५७ इतकी आहे. यामध्ये नाशिक २४,९६५ मतदारसंख्या तर धुळे ८,१६५, नंदुरबार ५,४९५, जळगांव १३,११४, अहमदनगर १४,८१८  इतकी मतदारसंख्या आहे. २०१८ मध्ये नाशिक मतदारसंघात एकूण मतदार संख्या  ५३,८९२ इतकी होती. (Maharashtra Legislative Council Elections)

(हेही वाचा- Delhi Temperature: दिल्लीत उष्माघाताचा पहिला बळी!)

पदवीधर मतदार किती?

पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या मुंबई मतदारसंघात २८ मे २०२४ पर्यंत रोजीची  एकूण मतदारसंख्या १,१६,९२३ इतकी आहे. यामध्ये मुबंई शहर मध्ये ३१,२२९ तर मुबंई उपनगरमध्ये ८५,६९४ इतकी मतदारसंख्या आहे. सन २०१८ ची मुंबई या मतदारसंघातील एकूण मतदार नोंदणी ही ७०,५१३ इतकी होती.   कोकण मतदारसंघात एकूण मतदारसंख्या २,१३,९१७ इतकी आहे. यामध्ये पालघर मध्ये २५,११५  तर ठाण्यामध्ये ९५,०८३, रायगडमध्ये ५३,५४३, रत्नागिरी २२,२०५, सिंधुदुर्ग १७,९७१  इतकी मतदारसंख्या आहे. सन २०१८ ची कोकण या मतदारसंघातील एकूण मतदार नोंदणी ही १,०४,४८८ इतकी होती. (Maharashtra Legislative Council Elections)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.