ससून ब्लड सॅम्पल फेराफेरी प्रकरणी पुणे पोलीस कसून चौकशी करत आहेत. एक एक पत्ता बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. याच प्रकरणी आता ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) दोन-तीन नर्सची चौकशी करण्यात येत आहे. (Pune Porsche Car Accident)
(हेही वाचा – सहा महिन्यांनी देशात मोठा राजकीय भूकंप होईल; PM Narendra Modi यांचा दावा)
डीन विनायक काळे सक्तीच्या रजेवर
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात आता रोज नवे खुलासे होत आहेत. यात ससून रुग्णालयाचा भ्रष्ट कारभार समोर आला आहे. डॉ. अजय तावरे (Dr. Ajay Taware), डॉ. श्रीहरि हळनोर (Dr. Srihari Halnore) यांच्यावर रक्ताचे पुरावे बदलल्याच्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे आणि त्यांना निलंबित करण्यात आले आहे. ससूनचे डीन विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. याच तपासाचा पुढचा भाग म्हणून आता ससून रुग्णालयातील नर्सचीही चौकशी करण्यात येत आहे.
सीटीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना आढळला नर्सचा सहभाग
ज्या वेळी रक्ताच्या नमुन्यांमध्ये आदलाबदल करण्यात आली, तेव्हा डॉ. तावरे आणि हळनोर यांच्यासोबत दोन-तीन नर्सदेखील असल्याचे सीटीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना आढळून आले आहे. या नर्सचा या प्रकरणाशी काही संबंध आहे?, याचा तपास केला जात आहे. या दोघा डॉक्टरांच्या समवेत असणाऱ्या नर्सला पोलिसांनी पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी बोलवले आहे.
ससून रुग्णालयात कोणाच्या सांगण्यावरून असे प्रकार घडत आहे, याची संपूर्ण चौकशी केली जात आहे. शिपायांपासून ते नर्सपर्यंत संबंधित सगळ्यांची चौकशी केली जात आहे. ससूनमधून रक्ताच्या नमुन्यात फेराफेरी केल्याने या संदर्भात ससूनचे डीन यांना प्रश्न विचारले जात आहेत. (Pune Porsche Car Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community