Delhi Temperature: दिल्लीत उष्माघाताचा पहिला बळी!

178
Delhi Temperature: दिल्लीत उष्माघाताचा पहिला बळी!
Delhi Temperature: दिल्लीत उष्माघाताचा पहिला बळी!

दिल्लीतल्या (Delhi Temperature) राम मनोहर रुग्णालयात मूळचा बिहारचा असलेल्या ४० वर्षीय माणसाचा मृत्यू झाला आहे. त्याला उन्हाचा तडाखा बसल्याने या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उष्मा सहन न झाल्याने या माणसाला सोमवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दिल्लीत सूर्य आग ओकतो आहे आणि उकाडा प्रचंड वाढला आहे. अंगाची लाही लाही होते आहे. अशात दिल्लीत उष्माघाताचा बळी गेला आहे. (Delhi Temperature)

ताप १०७ डिग्रीवर

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात एका माणसाचा उष्माघाताने (heatstroke) मृत्यु झाला आहे. त्याला ताप आला म्हणून रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं. त्याचा ताप थर्मामीटरवर मोजण्यात आला तेव्हा तो १०७ डिग्री इतका प्रचंड होता, असं डॉक्टरांनी सांगितलं. (Delhi Temperature) सदर रुग्ण हा अशा खोलीत राहात होता जिथे कूलर आणि पंखा काहीही नव्हतं. त्याला सणकून ताप आला. आम्ही जेव्हा त्याचा ताप मोजला तेव्हा पारा १०७ डिग्रींवर गेला. त्या माणसाची प्राणज्योत मालवली आहे. दिल्लीत उष्माघाताचा हा पहिला बळी आहे. असं डॉक्टरांनी सांगितलं. (Delhi Temperature)

‘रेड अलर्ट’ जारी

बुधवारचा दिवस म्हणजेच २९ मे चा दिवस हा दिल्लीतला मागील १०० वर्षांतला सर्वात उष्ण दिवस म्हणून नोंदला गेला. मुंगेशपूर हवामान विभागाने ही माहिती दिली. पारा ५० डिग्रींच्या पुढे गेला होता. कडक उन्हामुळे (Delhi Temperature) शहरात पुढील दोन दिवस ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. एकीकडे तापमानाचा पारा वाढत असताना दिल्लीत जलसंकटही निर्माण झाले आहे. दिल्लीतील अनेक भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. (Delhi Temperature)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.