Jitendra Awhad यांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर आंदोलन – रामदास आठवले

216
Jitendra Awhad यांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर आंदोलन - रामदास आठवले

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याची अक्षम्य घोडचुक करणाऱ्या स्टंटबाज जितेंद्र आव्हाड यांचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने गुरुवारी (३० मे) मुंबईत चैत्यभुमी येथे जितेंद्र आव्हाड यांचा फोटो जाळून तीव्र निषेध करण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांचे कृत्य माफ करण्यासारखे नसुन त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. (Jitendra Awhad)

(हेही वाचा – Delhi Temperature: दिल्लीत उष्माघाताचा पहिला बळी!)

मुंबई चैत्यभुमी येथे गुरुवारी, दुपारी १२ वाजता रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या वतीने स्टंटबाज जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांच्या नेतृत्वात जितेंद्र आव्हाड यांचे फोटो जाळण्याचे निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश माहातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनावणे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, महिला आघाडी मुंबई अध्यक्ष उषाताई रामळू, जिल्हा अध्यक्ष संजय डोळसे, रमेश गायकवाड, संजय पवार, साधु कटके, हरिहर यादव, सोना कांबळे, रवी गायकवाड आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. (Jitendra Awhad)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.