महाडच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुरुवार, ३० मे रोजी आव्हाडांविरोधात पनवेलमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, कामगारनेते जितेंद्र घरत, अनुसूचित जाती मोर्चाचे अरुण सोळंकी, विनायक मुंबईकर, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, अविनाश गायकवाड, अनंता गायकवाड, श्याम साळवी, मयूर कदम, रावसाहेब खरात, मधुकर उरणकर, अमोल जाधव, कोषाध्यक्ष शोभा मिंठबावकर, चित्रा भंडारी, सदस्य संजय कांबळे, आनंद जाधव, संतोष म्हस्के, चंद्रकांत सोनवणे, सुरजित टाक, सर्जेराव साळवे, गोपाल पडे, अनंता वाहुळकर, उमेश कांबळे, आत्रम, गणेश जाधव, देवद ग्रामपंचायतीचे सदस्य बंटी रसाळ, ढवळे, तायडे, विष्णू गायकवाड, चेतन कांबळे, यांच्यासह भीम अनुयायी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
(हेही वाचा Jitendra Awhad यांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर आंदोलन – रामदास आठवले)
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महाड आंदोलनादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. महाडच्या आंदोलनाचे वेळी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृती असे लिहिलेले फोटो आणले होते. मनुस्मृती फाडण्याचे आंदोलन करत असताना आव्हाड आणि त्यांच्या कार्यकत्यांनी आंबेडकरांचे फोटो फाडले. त्यामुळे भीम अनुयायींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्या अनुषंगाने आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या विरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात तसेच पुण्यातील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल झाला आहे. स्टंटबाजीच्या नादात आव्हाडांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून अपमान केला आहे, त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशीची जोरदार मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community