BJP : निवडणूक निकालानंतर भाजपा ‘भाकरी फिरवणार’?

275
BJP ची 99 उमेदवारांची यादी जाहीर; दोन आमदारांना डच्चू
BJP ची 99 उमेदवारांची यादी जाहीर; दोन आमदारांना डच्चू

लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपाच्या राष्ट्रीय तसेच राज्य कार्यकरिणीमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता असून राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भूपेंद्र यादव तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदासाठी भागवत कराड यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (BJP)

भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांचा कार्यकाळ गेल्यावर्षी जुन २०२३ ला संपुष्टात आया होता. मात्र, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नड्डा यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढविण्यात आला. ही वाढीव मुदतही जूनमध्ये संपणार असल्याने भाजपाच्या घटनेनुसार, अध्यक्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच नव्या अध्यक्षांची नियुक्ती केली जाते. नव्या अध्यक्षांनी पदभार स्वीकारल्यानंतर संघटनेतील कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातील, असे सांगण्यात आले. (BJP)

अमित शाह यांचे निकटवर्ती होणार अध्यक्ष?

भाजपा अध्यक्ष पदाच्या शर्यतीत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे नाव आघाडीवर आहे. यादव हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अतिशय जवळचे मानले जात आहे. यादव हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही विश्वासातील असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे केंद्रात भाजपाचे सरकार स्थापन झाल्यास पक्षाच्या अध्यक्षपदी भूपेंद्र यादव यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. (BJP)

(हेही वाचा – डॉ. आंबेडकरांच्या अवमानप्रकरणी Jitendra Awhad यांच्या विरोधात पनवेलमध्ये तीव्र निदर्शने)

राज्यातील एका नेत्याचेही नाव चर्चेत

अध्यक्ष पदासाठी महाराष्ट्रातील एका नेत्याचेही नाव चर्चेत आहे. अमित शाह यांच्या विश्वासातील या नेत्याकडे लोकसभा निवडणुकीत महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली होती. भाजपाच्या नव्या अध्यक्षासाठी आता निवडणूक होणार नाही. पक्षाच्या संसदीय मंडळाकडून नव्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. दिल्लीत झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात अध्यक्षांच्या नियुक्तीचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. त्यानुसार संसदीय मंडळाला अध्यक्षांच्या नियुक्तीचे अधिकार मिळाले आहेत. (BJP)

राज्यात नवा ओबीसी चेहेरा?

राज्यातही पुढील सहा महिन्यात विधानसभा निवडणूकीला सामोरे जाताना, भाजपाकडून भाकरी फिरवणार जाणार, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. राज्यातील प्रदेश कार्यकरिणीतही मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळत असून प्रदेश अध्यक्ष पदासाठी नवा ओबीसी चेहेरा, माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. मराठवाडयातील पहिले बालरोग शल्यचिकित्सक कराड यांनी छत्रपती संभाजी नगरचे दोन वेळा महापौरपद भूषवले असून मार्च २०२० मध्ये त्यांची वर्णी राज्यसभेवर करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्रीपदही त्यांनी भूषवले असून आता नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.