राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मागील दोन दिवसांपूर्वी जोगेश्वरी मजासवाडी नाल्याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. या पाहणी मध्ये नाल्यामधील गाळ पूर्ण काढून झाल्याचे मुख्यमंत्र्यांना दाखवण्यात आले. मात्र, असे असले तरी याच नाल्याच्या वरील बाजुस सर्वोदय नगर येथील भागांतील या नाल्याचा भाग हा गाळ आणि कचऱ्याने भरलेला पहायला मिळत आहे. त्यामुळे एका बाजुला नाला भरलेला आणि दुसऱ्या बाजुला भरलेला असल्याने महापालिकेचे अधिकारी हे मुख्यमंत्र्यांची फसवणूक करतात की जनतेची असा सवाल उपस्थित होत आहे. (Nala Safai)
मुंबईतील नाले सफाईच्या मुद्द्यावरून भाजपा आक्रमक होऊन त्यांनी नाले सफाईतील गाळाबाबत रतन खत्री चे आकडे असल्याचे आरोप केले. या आरोपानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मान्सूनपूर्व कामाचा आढावा घेत आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका मुख्यालयात येऊन भेटला. त्यानंतर रविवारी मुंबईतील पाच ते सहा ठिकाणी नाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जोगेश्वरी मजासवाडी नाल्याची पाहणी करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोगेश्वरीतील स्थानिक आमदार रवींद्र वायकर यांच्यासह या मजास नाल्याची गाळ काढलेल्या भागाची पाहणी केली. या नाल्यातील साफसफाई योग्य प्रकारे होत असल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. (Nala Safai)
(हेही वाचा – बहुचर्चित जया शेट्टी हत्याकांड प्रकरणी कुख्यात डॉन Chhota Rajan दोषी)
जोगेश्वरी (पूर्व) मजास नाला सर्वोदय नगर येथील तक्षिला सोसायटी पासून मेघवाडी नाक्यापर्यंत नाला अद्यापही साफ झालेला नाही. मजास नाल्याचा हा भाग असून याच नाल्याच्या वरील बाजुस नाला संपूर्णपणे भरलेला असल्याचे पहायला मिळत आहे. स्थानिक माजी नगरसेवक बाळा नर यांनी याबाबत बोलतांना मुख्यमंत्र्यांना मजास नाला साफ झालेला दाखवला जात असला तरी प्रत्यक्षात याच नाल्याच्या सर्वोदय नगर परिसरातील नाले गाळ आणि कचऱ्याने भरलेलेच आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही याची दखल घेत नाहीत. ठेकेदार हे अधिकाऱ्यांचे ऐकत नाहीत. त्यामुळे हे नाले केवळ मुख्यमंत्र्यांना दाखवण्यापुरतीच साफ केले जातात अशी तक्रारच नर यांनी केली आहे. (Nala Safai)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community