Railway Mega Block : बेस्ट आणि एसटीच्या जादा बसेस प्रवाशांच्या सेवेला

1560
Railway Mega Block : बेस्ट आणि एसटीच्या जादा बसेस प्रवाशांच्या सेवेला

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यानच्या स्थानकांच्या फलाटांचे रुंदीकरण आणि विस्तारीकरण करण्यात येत असल्याने याकरता मध्य रेल्वेने ३१ मे २०२४ ते २ जून २०२४ असा तीन दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या मेगाब्लॉक दरम्यान रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता बेस्ट आणि एस टी बसची अतिरिक्त सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये बेस्टच्या बसच्या माध्यमातून ५५ अतिरिक्त बसेस चालवून त्याद्वारे ४८६ बस फेऱ्यांची सेवा प्रवाशांना उपलब्ध करून दिली जाणार आहे, तर एस टी बसच्या माध्यमातून ५० अतिरिक्त बसेसची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. (Railway Mega Block)

मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉक दरम्यान लोकल सेवेवर होणारा परिणाम लक्षात घेता मध्य रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट उपक्रमातर्फे शुक्रवारी ३१ मे तसेच शनिवारी ०१ जून रात्री साडेबारा वाजल्यापासून रविवारी २ जून २०२४ दुपारी साडेबारा वाजेपर्यंत कुलाबा, धारावी आगार, बँकबे, प्रतीक्षा नगर आदी आगारांमधून अतिरिक्त बेस्ट बसेस सोडल्या जाणार आहेत. (Railway Mega Block)

(हेही वाचा – मुस्लिम पुरुषाने हिंदू महिलेशी केलेला विवाह अवैध ठरतो; High Court चा महत्वाचा निर्णय)

एस टीच्या ५० जादा गाड्या

गुरूवार मध्यरात्री साडे बारा वाजेनंतर ठाणे स्थानकात सुरू होणारा ६३ तासांचा आणि शुक्रवार (३१ मे) मध्यरात्री साडेबारानंतर सीएसएमटीत ३६ तासांचा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ब्लॉकमुळे राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने मुंबईतील कुर्ला नेहरूनगर, परळ आणि दादर स्थानकातून ठाणेसाठी ५० जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबई आगारातील २६ आणि ठाणे आगारातून २४ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवासी मागणी लक्षात घेता यात आवश्यकतेनूसार वाढ करण्यात येणार आहे. प्रवाशांना मार्गदर्शनासाठी ठाणे आणि मुंबई आगारात अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने दिली. (Railway Mega Block)

बेस्टच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या अतिरिक्त बसेस
१ जून रात्री साडेबारा ते २ जून दुपारी साडेबारापर्यंत – 
  • बस क्रमांक १ : सिएसएमटी ते दादर पूर्व (४ बसेस, ८० फेऱ्या)
  • बस क्रमांक २ मर्यां : कुलाबा आगार ते भायखळा स्थानक (४ बसेस, ८० फेऱ्या)
  • बस क्रमांक एसी १० : कुलाबा वडाळा स्थानक पश्चिम (४ बसेस, ७२ फेऱ्या)
३१ मे ते १ जून ते २ जून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत –
  • एसी १० : कुलाबा आगार ते वडाळा स्थानक (५ बसेस, ३० फेऱ्या)
  • लिमिटेड ११ : सिएसएमटी ते धारावी आगार (५ बसेस, ३० फेऱ्या)
  • बस क्रमांक ४ : मुखर्जी चौक ते प्रतीक्षा नगर (५ बसेस, २० फेऱ्या)
  • बस क्रमांक ए४५ : बॅकबे आगार ते माहुल (५ बसेस, २० फेऱ्या)
  • बस क्रमांक १ : कुलाबा आगार ते खोदादाद सर्कल (५ बसेस, ३० फेऱ्या)
  • बस क्रमांक २ मर्यां : सिएसएमटी ते भायखळा स्थानक (३ बसेस, २४ फेऱ्या)
  • बस क्रमांक सी ४२ : राणी लक्ष्मी चौक ते दादलानी पार्क (५ बसेस, २० फेऱ्या)
  • बस क्रमांक २ मर्यां : सिएसएमटी ते भायखळा स्थानक पश्चिम (५ दुमजली बसेस, ४० फेऱ्या)
  • ए १७४ अँटॉप हिल ते वीर कोतवाल उद्यान प्लाझा, (५ बसेस, ४० फेऱ्या) (Railway Mega Block)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.