ताडोबा अंधारी व्याघ्र प्रशासनाने (Tadoba-Andhari Tiger Reserve) आता नोंदणीकृत असलेल्या सर्व जिप्सींमध्ये जीपीएस अलर्ट सिस्टिम लावण्याचे ठरवले आहे. जूनमध्ये काही जिप्सींमध्ये याचे परीक्षण केले जाणार असून जुलैमध्ये बफरमध्ये जीपीएस अलर्ट सिस्टिम सुरू करण्यात येईल, अशी माहिती ताडोबाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी दिली. रिअल टाईम अलर्टची कोणतीही यंत्रणा सध्या उपलब्ध नाही. हे लक्षात घेता जीपीएस अलर्ट सिस्टिम लावण्यात येणार आहे. जूनमध्ये टेस्टिंग पूर्ण होईल, असे रामगावकर यांनी सांगितले.
(हेही वाचा – Zakir Naik ला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करा; Hindu Janajagruti Samiti ची मागणी)
टी-114 वाघिणीची झाली होती कोंडी
काही काळापूर्वी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात टी-114 ही वाघीण कच्च्या रस्त्यावर दिसताच आसपासच्या जिप्सींनी तिला घेरले. एकदम एवढ्या जिप्सी आजूबाजूला आल्याने त्या वाघिणीला मागेपुढेही जाणे शक्य नव्हते. अनेक वाहनांनी कोंडी केल्याने गोंधळलेल्या या वाघिणीचे छायाचित्र व्हायरल झाले आहे आणि हा प्रकार उघड झाला. यानंतर ही यंत्रणा लगेगच कामाला लागली.
या प्रकरणी ताडोबा प्रशासनाने 25 जिप्सी चालक व मार्गदर्शकांवर कारवाई केली. त्यानंतर आता जिप्सींना ‘रिव्हर्स’ आणि ‘यू-टर्न’ घेण्यावर बंदी घातली आहे. वास्तविक हे प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाचे ‘बघीरा’ हे ॲप (bagheera app) आहे. वाघांच्या अधिवासात होणाऱ्या पर्यटना दरम्यान पर्यटक वाहनांकडून होणाऱ्या वाहनाच्या गतीचे उल्लंघन, एकापेक्षा अधिक वाहनांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी, ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ थांबणारी वाहने या गोष्टी टाळण्यासाठी ‘बघिरा ॲप’ डाऊनलोड असलेला मोबाईल प्रत्येक जिप्सीत ठेवण्यात येतो. या मोबाईलमध्ये फक्त हे ‘बघिरा ॲप’च असते हे विशेष. टी 114 ची कोंडी झाली तेव्हाही वाहनांमध्ये तो मोबाईल होताच; तरीही ही घटना घडल्याने नवी यंत्रणा लागू करण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community