Gold Price In Mumbai: मोठ्या तेजीनंतर सोन्याच्या दरात घरसण, पाहा काय आहेत लेटेस्ट रेट 

161
Gold Price : सोनं ८०,००० तर चांदी १ लाखांच्या वर जाण्याच्या वाटेवर

सराफा बाजारात सोन्याच्या दरानं पकडलेला वेग गुरुवारी काहीसा मंदावला आहे. आयबीजेएच्या  ताज्या दरानुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव ४२३ रुपयांनी घसरून ७१,९९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २१ मे रोजी सोन्यानं ७४२२२ रुपयांचा उच्चांक गाठला होता. (Gold Price In Mumbai)

  • २४ कॅरेट सोन्याचा भाव ७१,९९० रुपये प्रति १० ग्रॅम
  • २३ कॅरेट सोन्याचा भाव ७१,७०२ रुपये प्रति १० ग्रॅम
  • २२ कॅरेट सोन्याचा भाव ६५,९४३ रुपये प्रति १० ग्रॅम
  • १८ कॅरेट सोन्याचा भाव ५३,९९३ रुपये प्रति १० ग्रॅम
  • १४ कॅरेट सोन्याचा भाव ४२,११४ रुपये प्रति १० ग्रॅम

गुरुवार, ३० मे रोजी जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याचा दर ७३८५३ रुपये प्रति १० ग्रॅम असेल. इतर शुल्कांसह हा दर ८१२३८ रुपयांच्या जवळपास असेल. तर आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ३८७ रुपयांनी कमी होऊन ६६७१७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर जीएसटी, ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि नफा जोडल्यानंतर २२ कॅरेटचा भाव ७४७१३ रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

(हेही पाहा – Supreme Court : सरकारी नोकरीत पदोन्नती अधिकार नाही )

गुरुवारी १८ कॅरेट सोन्याचा भाव १२८ रुपयांनी कमी होऊन ४३,९९३ रुपये झाला आहे. तर जीएसटी, ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि नफा मिळून १८ कॅरेट सोन्याचा भाव ६११७४ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह ७४१४९ रुपये प्रति १० ग्रॅम असेल. 

(टीप सोन्या-चांदीचे दर आयबीजेएद्वारे जारी करण्यात येतात. यामध्ये जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. तुमच्या शहरात सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० रुपयांची तफावत असू शकते.) (Gold Price In Mumbai)

 

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.