Marriage Dress For Men: पुरुषांनी लग्नात काय घालावं? प्रश्नात पडलात? तर ‘हे’ नक्की वाचा

222
Marriage Dress For Men: पुरुषांनी लग्नात काय घालावं? प्रश्नात पडलात? तर 'हे' नक्की वाचा
Marriage Dress For Men: पुरुषांनी लग्नात काय घालावं? प्रश्नात पडलात? तर 'हे' नक्की वाचा

लग्नात काय घालायचं? (Marriage Dress For Men) हा प्रश्न कधी ना कधी प्रत्येकाच्या वाट्याला येतोच. लग्नासाठी किंवा लग्नाच्या रिसेप्शनच्या वेळी पुरुषांसाठी फॉर्मल पोशाख हा आकर्षक ठरु शकतो. लग्न म्हटलं की, शेरवानी, जोधपूरी वैगरेला पहिली पसंती दिली जाते. आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणी साधेपणात कडक लूकची देण्यासाठी फॉर्मल वेअरला प्राधान्य देणं हा देखील एक परफेक्ट पर्याय आहे. यासाठी तुम्हाला कपड्यांची निवड करताना काही गोष्टी माहिती असायला हव्यात. (Marriage Dress For Men)

लग्न समारंभासाठी अधिक उत्तम आणि लूक (Marriage Dress For Men) मिळवण्यासाठी तुम्ही फॉर्मलसोबत काही गोष्टींचा समावेश करु शकता. ज्यामुळे लूक बहरदार होण्यास मदत मिळेल. फॉर्मल पोशाखासाठी तुम्ही टक्सेडो सूट, थ्री-पीस पँट सूट, टू-पीस ब्लेझर सूट, कोट पँट सूट आणि इतर अनेक कॉम्बोज ट्राय करु शकता. हे पोशाख अतिशय स्टायलिश आहेत. (Marriage Dress For Men)

पुरुषांसाठी क्लासिक सूट – क्लासिक सूट हा लग्न समारंभासारख्या समारंभासाठी एक उत्तम पर्याय ठरु शकतो तो गडद रंगात येतो. याची बेस शेड रॉयल ब्लूमध्ये असते. ज्याला नाईट ब्लू देखील म्हटले जाते. (Marriage Dress For Men)

नेहरु जॅकेट सूट फॉर्मल ड्रेस – कुर्त्यासह नेहरु जॅकेटचे कॉम्बिनेशन हा फॉर्ममध्ये एक खास गेटअप ठरेल. सुपर स्लीक जॅकेट आणि कुर्त्यामध्ये योग्य पॅटर्नची निवड करुन तुम्ही लग्नाचा लूक उठावदार करु शकता. पुरुषांसाठी फॉर्मल ड्रेसमध्ये लग्नाच्या पोशाखासाठी हा सर्वात फॅशनेबल पर्याय ठरेल. (Marriage Dress For Men)

सॅटिन जोधपुरी सूट फॉर्मल ड्रेस – या सूटचा पॅटर्नच मुख्य आकर्षणाचा भाग ठरतो. साधे पण मोहक पॅटर्न असलेल्या फॅब्रिकने हा सूट सजलेला आहे. रॉयल सिल्क कापडात तयार करण्यात आलेला हा ड्रेस सेमी फॉर्मलमध्ये मोडतो. (Marriage Dress For Men)

ग्रे ब्लेझर सूट फॉर्मल ड्रेस – राखाडी रंग हा लग्न समारंभातील कार्यक्रमात बहुतांशवेळा दिसून येतो. हा एक क्लासिक ग्रे सूट आहे. स्टायलिश आणि मोहक डिझाईन याला लग्न समारंभासाठी सर्वोत्तम ठरवते. विजय देवरकोंडाचा क्लासिक ग्रे सूट आठवतो का? तो बऱ्याचदा चित्रपटाच्या प्रमोशनवेळी या धाटणीतील सूट घालतो. या फॉर्मल ड्रेसमध्ये तो खूपच हॉट दिसला आहे. (Marriage Dress For Men)

ग्रीन सूट फॉर्मल ड्रेस – लग्न समारंभासाठी हा एक आदर्श मजबूत आणि सुपर फॅशनेबल पर्याय आहे. पुरुषांसाठी हिरव्या रंगाच्या फॉर्मल ड्रेसची ही एक खास शैली आहे, जी भारतातील वरांसाठी सर्वात असामान्य रंगांपैकी एक ठरते. टायशिवाय तुम्ही लूक परिपूर्ण करु शकता. स्टाईल खुलवण्यासाठी दोन बटणे खुली ठेवा. (Marriage Dress For Men)

इंडो वेस्टर्न फॉर्मल ड्रेस – हा पॅटर्न कुर्ता कम फॉर्मल वेडिंग सूटसारखा आहे. याच्या माध्यमातून तुम्ही लग्नाच्या दिवशी अतिशय आकर्षक लूक मिळवू शकता. काहीजण नेहमीच्या कुर्त्यासोबत जीन्स घालतात. पण असा सूट तुमच्या आदर्श आणि आरामदायी पायजमा सेटसोबत अधिक छान दिसतो. (Marriage Dress For Men)

टक्सेडो सूट – फॉर्मलमध्ये नवरदेवासाठी टक्सेडोसारखा उत्तम पर्याय अन्य कोणताही असू शकत नाही. बहुतांश वेळा टक्सेडो ब्लॅक कलरमध्ये निवडला जातो. तुम्ही याला पसंती देऊ शकता. याशिवाय मिडनाइट ब्लूसह लूक खास खरु शकता. (Marriage Dress For Men)

टीप :

लग्न सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. त्यामुळे या दिवशी सर्वोत्तम दिसण्यासाठी आवश्यक गोष्टी करण्यावर नवरदेव भर देतो. जर तुम्हाल फॉर्मल लूकसह लग्न सोहळ्यात मिरवायचे असेल तर या टिप्स तुम्हाला नक्कीच कामी येतील. (Marriage Dress For Men)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.