- एक महिन्याने मी आपल्याला भेटत आहे.
- एक महिन्यानंतर आपण कुठे आहोत, काय केले पाहिजे, हे सांगण्यासाठी मी आलो आहे.
- आपण जी बंधने पाळत आहात त्याचा परिणाम आज दिसत आहे.
- तौक्ते वादळ आपल्या किनारपट्टीला स्पर्श करुन गेले.
- गेल्या वर्षी निर्सग आले. ही अशी वादळं आता दरवर्षी येऊ लागली आहेत.
- आपल्या प्रशासनाने चांगले काम केले आहे.
- मी रत्नागिरी सिंधुदुर्ग ला जाऊन आलो.
- होय मी धावता दौरा केला.
- मी तिथे जाऊन पाहिलं तेव्हा नुकसान किती झाले याची पाहणी केली.
- मधल्या काळात पंतप्रधानांसोबत बैठक झाली.
- केंद्राचे काही निकष आहेत ते आता बदलायला हवेत, अशी मी विनंती करत आहे.
- लोकांवर नाईलाजाने आपल्याला बंधने घालावी लागत आहेत.
- अजूनही आपण खाली आलेलो नाही.
- आज आकडेवारी खाली आलेली आहे.
- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्के आहे.
- मृत्यूदर 1.62 टक्के इतका आहे.
- आता आपण निर्बंध लावत आहोत, कडक लॉकडाऊन लावत नाही.
- काही जिल्ह्यांत रुग्ण संख्या वाढत आहे.
- शहरी भागात रुग्ण संख्या कमी होत आहे.
- तिसरी लाट ही आपल्याला तारीख सांगून येणार नाही.
- म्युकरमायकोसीसचे आपल्या राज्यात 3 हजार रुग्ण आहेत.
- या सर्व गोष्टी आपण डॉक्टरना सांगत आहोत.
- आपण माझा डॉक्टर ही संकल्पना राबवली आहे.
- डॉक्टरांशी संवाद मी साधला.
- या सर्वांना मी आवाहन केले आहे त्यांनी प्रतिसाद देखील दिला आहे.
- तिसरी लाट ही कदाचित बालकांसाठी धोकादायक असू शकते.
- बालकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती जास्त असते.
- आपल्यामुळे लहान मुलांना संसर्ग होऊ नये, म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे.
- 18 ते 44 वयोगटातील 6 कोटी नागरिक आहेत.
- जसा हा पुरवठा वाढेल, तशी प्रक्रिया देखील आपण वाढवू.
- लसीकरणासाठी लागणारी लस आणि त्याची उत्पादन क्षमता वाढायला हवी.
- 12वी च्या परीक्षांबाबत आपण आढावा घेत आहोत.
- केंद्राने देखील याबाबतीत एक धोरण ठरवायला हवे.
- शैक्षणिक धोरण हे केंद्राने ठरवायला हवे.
- ते सर्व राज्यांसाठी समान असायला हवे.
- शिक्षणाच्या बाबतीत काही तरी धोरण आखायला हवे.
- शिक्षण सुरू राहिले पाहिजे त्यासाठी क्रांतिकारक निर्णय घ्यावे लागतील.
- मी या आठवड्यात उद्योगपतींशी चर्चा करणार आहे.
- आपल्याला सर्व काही हळूहळू उघडले पाहिजे.
- आपल्याला कोविडवर मात करायची आहे.
- कोरोनामुक्त गाव करायला पाहिजे.
- गावात कोरोनाला थारा द्यायचा नाही.