Mumbai Disaster : डोंगराळ भागातील वस्त्यांसह धोकादायक इमारतींची आपत्कालिन व्यवस्थापन विभागाकडून रेकी

470
Mumbai Disaster : डोंगराळ भागातील वस्त्यांसह धोकादायक इमारतींची आपत्कालिन व्यवस्थापन विभागाकडून रेकी

बचाव आणि मदत कार्य पोहोचवतांना एकमेकांमध्ये योग्य समन्वय राखावा, या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने पुढाकार घेतला आहे. यामध्ये दोन दिवसीय कार्यक्रम आखून, संबंधित यंत्रणांना एकत्र आणून विविध ठिकाणी स्थळ पाहणी (रेकी) करण्यात येत आहे. मुंबईतील १०५ ठिकाणांपैकी शुक्रवारी ३१ मे २०२४ रोजी काही ठिकाणी रेकी करण्यात आली. तर शनिवारी १ जून २०२४ रोजीही उर्वरित ठिकाणी रेकी करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या वांद्रे, अंधेरी, मुलुंड, बोरिवली, मालाड आदी परिसरांमध्ये शुक्रवारी पाहणी करण्यात आली आहे. (Mumbai Disaster)

पावसाळापूर्व तयारीसाठी समन्वय

मुंबईतील पावसाळापूर्व तयारीसंदर्भात मागील आठवड्यात २३ मे २०२४ रोजी महानगरपालिकेत सर्व यंत्रणांची बैठक झाली होती. त्यानुसार मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामार्फत विविध यंत्रणांशी पावसाळापूर्व तयारीसाठी समन्वय राखला जात असल्याची माहिती महानगरपालिकेचे संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर यांनी सांगितले. (Mumbai Disaster)

(हेही वाचा – Manipur: रेमल चक्रीवादळामुळे मणिपूरला मोठा फटका! पूरग्रस्त भागातून शेकडोंचा बचाव)

आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचा पुढाकार

यंदाच्या पावसाळ्यात जोरदार पाऊस कोसळल्यास उद्भवणारी स्थिती तसेच जीर्ण इमारती, दरडप्रवण क्षेत्र आणि सखल भागात पाणी साचण्याची संभाव्य ठिकाणे इत्यादी प्रसंगांमध्ये आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर, सर्व संबंधित आपत्कालीन यंत्रणांनी सज्ज रहावे, बचाव आणि मदत कार्य पोहोचवतांना आपसामध्ये योग्य समन्वय राखावा, या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचा पुढाकार घेतला आहे. आपत्कालिन व्यवस्थापन कक्षाच्यावतीने दोन दिवसीय कार्यक्रम आखून, संबंधित यंत्रणांना एकत्र आणून विविध ठिकाणी स्थळ पाहणी (रेकी) करण्यात येत आहे. मुंबईतील १०५ ठिकाणांपैकी शुक्रवारी ३१ मे २०२४ रोजी काही ठिकाणी रेकी करण्यात आली. तर शनिवारी १ जून २०२४ रोजीही उर्वरित ठिकाणी रेकी करण्यात येणार आहे. (Mumbai Disaster)

मदत कार्यासाठी वाहनांचे मार्ग

मुंबईतील चिंचोळ्या व घनदाट वस्तीच्या भागात मदतकार्य पोहोचवितांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल तसेच आपत्कालीन स्थितीत मदत पोहोचवण्यासाठीचे जवळचे आणि सुटसुटीत मार्ग कोणते, मदत कार्यासाठी वाहनांचे मार्ग कसे निवडायचे, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या यंत्रणेची सज्जता आदींची चाचपणी देखील या पाहणीतून करण्यात आली. (Mumbai Disaster)

आपत्तीत अडकलेल्या नागरिकांची सुखरुप, तात्काळ सुटका

यामध्ये भारतीय लष्कर (आर्मी), भारतीय नौदल (नेव्ही), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ)चे जवान, मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, मुंबई अग्निशमन दल, महानगरपालिका विभाग कार्यालय (वॉर्ड) आदींचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती उद्भवल्यास आव्हानात्मक ठिकाणी मदतकार्य पोहचविण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, आपत्तीत अडकलेल्या नागरिकांची सुखरुप आणि तात्काळ सुटका कशी करता येईल, हा पाहणी करण्यामागचा उद्देश आहे, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. (Mumbai Disaster)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.