पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिर परिसरात एक तळघर आढळून आलं आहे. पहिल्यांदाच अशा पद्धतीचं तळघर आढळून आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सात ते आठ फूट खोल अंतरावर हे तळघर आढळून आलं असून त्यात काही मूर्तीही आढळून आल्या आहेत. (Pandharpur Vitthal Mandir)
(हेही वाचा – Vidhan Parishad Election : विधान परिषदेतील रिक्त जागांची संख्या वाढली; नक्की काय आहे कारण ?)
कान्होपात्रा मंदिराजवळ हे तळघर आढळून आलं असून इथं पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणीसाठी या मंदिरात दाखल झाले आहेत. या ठिकाणी असलेली माती सध्या बाहेर काढली जात आहे. जवळपास ४० ते ५० किलो माती बाहेर काढली जात आहे, त्याचंही परीक्षण केलं जाणार आहे. दरम्यान, या तळघरात तीन ते चार दगडी मूर्ती सापडल्या आहेत. तसेच एक पादुकाही सापडली आहे. पण या मूर्ती नेमक्या कशाच्या आहेत? हे अद्याप कळू शकलेलं नाही. (Pandharpur Vitthal Mandir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community