निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला; आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्या…

208
निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला; आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्या...
निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला; आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लोकसभा निवडणुकांचा (loksabha election 2024) प्रचार संपल्यानंतर कन्याकुमारी येथे ध्यानधारणा करत आहेत. याचे माध्यमांतून मोठ्या प्रमाणात वार्तांकनही होत आहेत. या विरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या कन्याकुमारीतील ध्यान धारणेदरम्यानच शनिवारी सातव्या टप्प्याचे मतदान होणार आहे. यामुळे मतदानापूर्वी 48 तासांचा ध्यानधारणेचा कालावधी आदर्श आचार संहितेचे उल्लंघन आहे, अशा स्वरुपाची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

(हेही वाचा – Bomb Threat : जम्मू-काश्मीरमध्ये विस्ताराच्या विमानात बॉम्बची धमकी)

पंतप्रधान मोदी मतं मागत नाहीत

निवडणूक आयोगाने काँग्रेसला उत्तर देतांना म्हटले आहे की, निवडणूक आयोग माध्यमांना वार्तांकन करू नका, असे सांगू शकत नाही. उद्या पंतप्रधान त्यांच्या घरात ध्यान करत असतील आणि प्रसारमाध्यमांनी ते कव्हर केले, तर ते उल्लंघन आहे का ? की विरोधी पक्ष असे म्हणत असेल, तर हे उल्लंघन आहे ? याला कसलाही अंत नाही. प्रत्येक उमेदवाराला चिन्ह आणि प्रतिकांच्या माध्यमातून संवाद साधण्याचा अधिकार आहे. पंतप्रधान मोदी मतं मागत नाहीत. विरोधकही अशा प्रकारे प्रतीकांची मदत घेऊ शकतात. आपण सर्वांनी कायद्याच्या कक्षेत राहून काम करावे लागेल.

आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्या

यानंतर निवडणूक आयोगाने पंतप्रधान कार्यालयालाही काही निर्देश दिले आहेत. ‘दोन दिवस चालणाऱ्या ध्यानधारणेदरम्यान आदर्श आचारसंहितेचे (MCC) उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्या, असा सल्ला निवडणूक आयोगाने पंतप्रधान कार्यालयाला दिला आहे. निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी परवानगीची गरज नाही, कारण ते भाषणे देत नाहीत. ही प्रक्रिया 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटी वापरल्या गेलेल्या प्रक्रियेप्रमाणेच आहे. तेव्हा मोदींनी (PM Narendra Modi) निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वीच मौन काळात बद्रीनाथ आणि केदारनाथला भेट दिली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.