Lok Sabha Election 2024 : भटिंडामध्ये हरसिमरत कौर यांची अग्निपरीक्षा

177
Lok Sabha Election 2024 : भटिंडामध्ये हरसिमरत कौर यांची अग्निपरीक्षा
  • वंदना बर्वे

सुखबीर सिंग बादल यांची सून आणि प्रकाशसिंग बादल यांची पत्नी माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांना यावेळेस भटिंडात अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. त्या २००९ पासून सलग तीन वेळा येथून निवडून येत आहेत. मात्र यावेळेस त्यांना विजयासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. भाजपा आणि शिरोमणी अकाली दल पहिल्यांदाच वेगवेगळे निवडणूक लढत आहेत. (Lok Sabha Election 2024)

पंजाबच्या राजकारणातील बाबा बोहड म्हणून ओळखले जाणारे प्रकाशसिंग बादल यांच्या अनुपस्थितीत शिरोमणी अकाली दल (एसएडी) पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढत आहे. यामुळे या निवडणुकीत केवळ बादल कुटुंबाचीच नव्हे तर शिरोमणी अकाली दलाचेही अस्तित्व पणाला लागले आहे. (Lok Sabha Election 2024)

शिअदचे प्रमुख या नात्याने सुखबीर सिंग बादल यांच्या खांद्यावर यावेळी खूप मोठी जबाबदारी आहे. त्यांना आपल्या पत्नीला तर निवडून आणावेच लागणार आहे. शिवाय पक्षालाही मुख्य प्रवाहात आणायचे आहे. सध्या ते फिरोजपूरहून खासदार आहेत. परंतु, आता निवडणूक लढत नाही आहेत. (Lok Sabha Election 2024)

सुखबीर सिंग बादल प्रचारात व्यस्त 

सुखबीर सिंग बादल प्रत्येक जागेवर आपल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रचार करत आहेत. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल कुठे आक्रमकपणे लढताना दिसत असेल तर ते भटिंडा आणि फिरोजपूरमध्ये. घराणेशाहीचा ठपका टाळण्यासाठी त्यांनी कुटुंबातील इतर कोणालाही तिकीट दिलेले नाही. त्यांचे मेहुणे आणि माजी मंत्री आदेश प्रताप सिंह कैरॉन यांची खडूर साहिबमधून निवडणूक लढविण्याची इच्छा होती. परंतु त्यांनाही तिकीट दिले नाही. यामुळे त्यांनी पक्षाच्या विरोधात प्रचार करायला सुरवात केली आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Indrayani River मध्ये दररोज सहा अब्ज लिटर दूषित पाणी; MPCB ने राष्ट्रीय हरित लवादाला दिली माहिती)

मेव्हण्याला बाहेरचा रस्ता दाखवला

सुखबीर सिंग यांनी नात्याची पर्वा न करता आपल्या मेव्हण्याला पक्षातून बाहेर काढले. चौथा विजय नोंदवण्यासाठी धडपडणाऱ्या हरसिमरत या प्रत्येक भाषणात प्रकाशसिंग बादल यांनी या जागेवर केलेल्या कामाची आठवण करून देत आहेत. या युक्तिवादांनी विरोधकांना निरूत्तर केले आहे. भटिंडात एम्स आणि केंद्रीय विद्यापीठासारख्या अनेक संस्था सुरू करण्यात आल्या आहेत. (Lok Sabha Election 2024)

हरसिमरत २००९ मध्ये पहिल्यांदा निवडून आल्या

राज्यात एसएडी-भाजपाचे सरकार असताना २००९ मध्ये हरसिमरत पहिल्यांदा या मतदारसंघातून जिंकल्या होत्या. या लोकसभा मतदारसंघात जे काही काम झाले आहे त्याचे श्रेय हरसिमरत कौर यांना नक्कीच मिळेल. त्या बऱ्याच काळापासून महिलांशी जोडलेल्या आहेत. पण यावेळी काळ थोडा बदलला आहे. शहरी मतांची पूर्तता करणारा भाजप आता एसएडीसोबत नाही. (Lok Sabha Election 2024)

विधानसभा प्रभारींनी पक्ष सोडला

भाजपाच्या उमेदवार परमपाल कौर यांना जेवढे मते पडणार आहेत ती सर्व हरसिमरत बादल यांच्या खात्यातूनच मिळणार आहेत. अर्थात हरसिमरत कौर यांचे तेवढी मते कमी होतील. परमपाल कौर यांचे सासरे सिकंदर सिंग मलुका, हे अनेक वर्षांपासून एसएडीचे जिल्हाध्यक्ष होते. परंतु आता तेही हरसिमरत यांना पाठिंबा देत नाहीत. दर्शनसिंग कोटफट्टा असोत किंवा लोकसभा मतदारसंघाच्या विधानसभा जागांचे प्रभारी जीत मोहिंदरसिंग सिद्धू असोत. यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. बलविंदरसिंग भुंदरसारखे नेते म्हातारे झाले आहेत. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Loksabha Election 2024 : 8 राज्यांतील 57 जागांवर 1 जूनला होणार मतदान; पंतप्रधानांच्या वाराणसीसह कोणत्या आहेत महत्त्वाच्या लढती ?)

आपने गुरमीत सिंग खुदियानला मैदानात उतरवले

आम आदमी पार्टीने गुरमीत सिंग खुद्दियान यांना भटिंडातून मैदानात उतरविले आहे. खुद्दियान यांनीच विधानसभेच्या निवडणुकीत बादल यांना पराभूत केले होते. खुद्दियान आता राज्यातील आप सरकारमध्ये मंत्री देखील आहेत. ते आता हरसिमरत कौर यांच्या विरोधात उभे आहेत. एसएडीच्या पंथक मतांचे जोपर्यंत पूर्णपणे विभाजन होत नाही तोपर्यंत शिअदची ताकद कायम आहे, याची आपला जाणीव आहे. सध्या आपमध्ये जे कार्यकर्ता आणि पदाधिकारी आहेत ते सर्व दुसऱ्या पक्षातूनच आलेले आहेत. त्यांचा आधीच्या पक्षात भ्रमनिरास झाल्यामुळेच ते आपमध्ये आलेत. (Lok Sabha Election 2024)

लक्खा सिधानाचा धोका कोणाला आहे?

भटिंडा या लोकसभा मतदारसंघातील आमदारांवरील नाराजीचा सामना आपच्या उमेदवाराला करावा लागत आहे. परंतु, खुद्दियान यांच्या चांगल्या प्रतिमेमुळे आप लोकांना विश्वासात घेण्यात यशस्वी होत आहेत. मात्र, क्राईम वर्ल्डमधून राजकारणात आलेले लख्खा सिधाना यांच्यामुळे आपपुढे समस्या निर्माण झाली आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत हातात झाडू घेऊन पंजाबमधील कचरा स्वच्छ करणारे तरूण आता लख्खा सिधाना यांच्यासाठी काम करीत आहेत. सिधाना जिंकणार नाही. पण आपची मते नक्कीच खाणार आहेत. (Lok Sabha Election 2024)

भाजपाच्या उमेदवारावर शहरी मतदारांचा विश्वास आहे

भाजपाच्या उमेदवार परमपाल कौर मलुका यांना शहरी मतांवर विश्वास आहे. मात्र या जागेवर भाजपाचे अस्तित्व नसल्यामुळे परमपाल कौर यांच्यासमोर अडचणी येत आहेत. काँग्रेसचे जीत मोहिंदर सिंग सिद्धू यांना अशी कोणतीही अडचण नाही. प्रत्येक विधानसभेच्या जागेवर काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत धावत आहेत. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.