पुण्यातील कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने आलिशान पोर्श कारने दोघांना चिरडल्याची घटना देशभर गाजत आहे. आतापर्यंत या प्रकरणी त्याचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) आणि आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल (Surendra Kumar Agarwal) यांना अटक करून सध्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. तसेच आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलणारे ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. हळनोर यांनाही अटक झाली आहे. आता पुणे पोलीस अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार असल्याचे पुढे आले आहे. बाल न्याय मंडळाने पुणे पोलिसांनी ही परवानगी दिली आहे.
(हेही वाचा – Local Railway Jumbo Block: मुंबई विद्यापिठाचा विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय)
बाल न्याय मंडळाने पोलिसांना दिले २ तास
या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची चौकशी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे पत्र पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे दिले होते. त्यानुसार आता बाल न्याय मंडळाने पुणे पोलिसांनी आरोपीच्या चौकशीची परवानगी दिली आहे. १ जून रोजी पुणे पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीची चौकशी करण्यात येणार आहे. बाल न्याय मंडळाने यासाठी २ तासांचा वेळ पोलिसांना दिला आहे. अल्पवयीन चालकाला बालसुधारगृहात ५ जूनपर्यंत ठेवण्यात आले आहे.
या प्रकरणात आरोपीच्या आईचाही समावेश असल्याची बाब पुढे आली आहे. १७ वर्षीय आरोपीच्या आईने मुलाचे रक्त नमुने बदलण्यासाठी स्वतःचे रक्त ससून रुग्णालयाला दिले असल्याचे समोर आले आहे. रक्त नमुने बदलण्यामध्ये डॉ. श्रीहरी हळनोर यांचा प्रमुख सहभाग होता. हळनोरनेच आईचेही रक्त नमुने घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. हळनोर यांच्या अटकेनंतर त्या बेपत्ता झाल्या आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (Pune Porsche Car Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community