मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (Coastal Road) अंतर्गत भूमिगत दक्षिणवाहिनी बोगद्याच्या दोन सांध्यांमधून झिरपणारे पाणी रोखण्यात येत आहे. तर तीन सांध्यांच्या ठिकाणी असणारा ओलावा आटोक्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी शुक्रवारी ३१ मे २०२४ रोजी पाहणी केली व सर्व दुरुस्तीच्या कामांची त्यांनी स्वत: खात्री केली. (Coastal Road)
भूमिगत बोगद्यात केलेल्या उपाययोजनांची माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी दिली. सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर आदी उपस्थित होते. (Coastal Road)
(हेही वाचा – India-Maldives Dispute : लक्षद्वीपमध्ये उघडली युनियन बँक ऑफ इंडियाची शाखा; स्थानिकांसह पर्यटकांना होणार लाभ)
कोस्टल रोड (Coastal Road) मार्गात अनेक ठिकाणी पाणी गळती लागल्याने वृत्त पसरताच मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अमित सैनी, उपायुक्त चक्रधर कांडलकर यांच्यासह कोस्टल रोडचे प्रमुख अभियंता आणि संबंधित कंपनीचे पदाधिकारी व तज्ज्ञ मंडळींसह प्रत्यक्षस्थळी भेट देवून पाहणी केली होती. (Coastal Road)
ही पाण्याची गळती जोडणीच्या ठिकाणी होत असून या जोडणीच्या ठिकाणी पॉलिमर ग्राऊंटींग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही मार्गिकांमधील प्रत्येकी २५ जोडणीच्या ठिकाणी इजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राऊंटींग करून कायमस्वरुपी तोडगा काढण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. या ग्राऊंटींगचे काम ३१ मेपर्यंत पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त भूषण गगराणी याने कोस्टल रोड मधील या पॉलिमर ग्राऊंटींगच्या कामाची पाहणी शुक्रवारी केली. (Coastal Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community