HSNC University: एच. एस. एन. सी. विद्यापीठात ‘कुलगुरू मंथन-2024’चे आयोजन

132
HSNC University: एच. एस. एन. सी. विद्यापीठात 'कुलगुरू मंथन-2024'चे आयोजन

मुंबईतील एच. एस. एन. सी. विद्यापीठाने नुकतेच ‘कुलगुरू मंथन-2024’चे आयोजन केले. यावेळी ‘कुलगुरू परिषद’ व्ही. सी. मंथन 2024 च्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (एन. सी. सी.) महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक (ए. डी. जी.) मेजर जनरल योगेंद्र सिंग होते. या कार्यक्रमात विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंशी महत्त्वपूर्ण चर्चा आणि संवाद झाला. (HSNC University)

WhatsApp Image 2024 05 31 at 23.28.08

 

एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला यांनी उद्घाटनपर भाषण केले आणि मुंबई ए, मुंबई बी, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि पुणे या एनसीसी युनिटच्या ७ विभागांच्या सर्व ग्रुप कमांडर्सचे हार्दिक स्वागत करण्यात आले. (HSNC University)

(हेही वाचा – ST चा ७६ वा वर्धापन दिन प्रत्येक बसस्थानकावर उत्साहात साजरा होणार)

यावेळी एडीजी योगेंद्र सिंह म्हणाले की, हा कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये एनसीसी संचालनालयाच्या संपूर्ण टीमने खूप प्रयत्न केले. यावेळी त्यांनी कुलगुरूंना एनसीसी कॅडेट्सचे भविष्य सुधारण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. एनसीसीच्या तिन्ही शाखांमधील (लष्कर, नौदल आणि हवाई दल) प्लेसमेंट, कॅडेट सहभाग आणि प्रशिक्षण कार्यक्रम, कौशल्य एएनओ, सुविधा तसेच मुला-मुलींसाठी पुरस्कार यासारख्या महत्त्वाच्या पैलूंचा समावेश असलेल्या ५ कलमी अजेंड्यावर या परिषदेने लक्ष केंद्रित केले.

अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एन. सी. सी. प्रशिक्षणाचा शैक्षणिक पाठ्यपुस्तकात समावेश करता येईल, याबाबत चर्चा करणे, हा कुलगुरु मंथन -२०२४चा मुख्य उद्देश आहे तसेच या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना एन. सी. सी. मधील त्यांच्या सहभागासाठी आणि कामगिरीसाठी शैक्षणिक श्रेय मिळवता येईल. प्रत्येक कुलगुरूंनी संचालनालयाला महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आणि हे मुद्दे उच्च तंत्र शिक्षण संचालक, मंत्रालय आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे प्रधान सचिव यांना कळवण्यात आली.

विद्यार्थ्यांना एनसीसीशी जोडण्यावर विशेष भर
17-25 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना एनसीसीमध्ये सामील होण्यासाठी प्रेरित करण्यावर यावेळी कुलगुरूंनी भर दिला. विद्यार्थ्यांना शिस्त आणि जबाबदार नागरिक बनण्यासाठी प्रेरणा मिळेल, या उद्देशाने हे कार्य करण्यात आले. व्ही. सी. मंथन 2024 हे उच्च शिक्षण संस्थांमध्ये एन. सी. सी. ची भूमिका वाढवण्याच्या दिशेने, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि राष्ट्रीय सेवेद्वारे विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना मिळावी, या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. एच. एस. एन. सी. विद्यापीठातील कार्यक्रमानंतर राजभवन येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. जेथे राष्ट्रीय स्तरावर एन. सी. सी. च्या यशाबद्दल मेजर जनरल योगेंद्र सिंग यांचा माननीय राज्यपालांनी सत्कार केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.