Ajit Pawar: आमदार सुनील टिंगरेंची भूमिका संशयास्पद; अजितदादा म्हणाले…

183
Ajit Pawar: आमदार सुनील टिंगरेंची भूमिका संशयास्पद; अजितदादा म्हणाले...
Ajit Pawar: आमदार सुनील टिंगरेंची भूमिका संशयास्पद; अजितदादा म्हणाले...

पुणे पोर्श कार अपघात (Pune Porsche Car Accident) प्रकरणात राज्य सरकार (Ajit Pawar) आणि पोलीस योग्यप्रकारे कारवाई करत आहेत. आम्ही सारखेसारखे कॅमेऱ्यासमोर येत नाही म्हणजे याप्रकरणात कोणतीही लपवाछपवी किंवा कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रकार होतोय, असे अजिबात नाही. विरोधक याप्रकरणात काय आरोप करतायत, हा त्यांचा अधिकार आहे. पण ही घटना घडल्यापासून आजपर्यंत चौकशीत जे जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई होताना दिसत आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले. ते शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

…त्यामध्ये सरकारची कोणतीही भूमिका नव्हती

या पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “पुणे अपघात प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुण्याचा पालकमंत्री म्हणून मी, आम्ही चौकशीचे आदेश दिले. चौकशी जसजशी पुढे सरकत गेली याप्रकरणात अनेकांचा सहभाग दिसून आला. सुरुवातीच्या काळात अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला. हा जामीन न्यायालयाने दिला होता, त्यामध्ये सरकारची कोणतीही भूमिका नव्हती. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणात लक्ष घातले तेव्हा अल्पवयीन मुलाविरोधात आणखी कलमं लावण्यात आली. चौकशीत दोन पोलीस अधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्याचे समोर आले. त्यांच्यावरही कारवाई झाली.” असे अजित पवार यांनी सांगितले. (Ajit Pawar)

पालकमंत्री म्हणून ‘हे’ सांगणं माझं काम आहे

या प्रकरणात अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करुन दबाव आणला होता, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. यावर उत्तर देताना अजित पवारांनी म्हटले की, मी सीपींना वर्षभर काही ना काही कारणासाठी फोन करत असतो. पुण्यातील अपघातानंतर मी (Ajit Pawar) त्यांना फोन करुन दोषींवर योग्य ती कारवाई करा, असे सांगितले. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हे सांगणं माझं काम आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. पण याप्रकरणात काहीजण माझ्यावरच घसरले, असा टोला अजितदादांनी अंजली दमानिया यांना लगावला. (Ajit Pawar)

या घटनेत निष्पाप लोकांचा जीव गेला

स्थानिक आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांच्याकडे शंकेने बघितले जातंय, असं पत्रकारांनी विचारल्यावर अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, “चौकशी करु द्या ना, मी पण बारामतीचा 32 वर्षांपासून आमदार आहे. आम्ही कामामुळे मुंबईत असतो, कधी पुण्यात असतो. मी मतदार संघात नसतो. जे आमदार असतात, ते बहुतेक त्यांच्या मतदारसंघात असतात. त्यामुळे आमदारांच्या मतदारसंघात एखादी घटना घडल्यास त्यांना संबंधित ठिकाणी जावं लागतं. एकदा सुनील टिंगरेंच्या मतदासंघात स्लॅब कोसळला होता. त्यावेळीही ते मदतीला धाऊन गेले होते. तसेच या घटनेत निष्पाप लोकांचा जीव गेला. त्यामुळे सुनील टिंगरे त्या ठिकाणी गेला आणि दोषींवर कारवाई करण्यास सांगितले होते.” असं अजित पवार म्हणाले आहेत. (Ajit Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.