- वंदना बर्वे
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) निकालानंतर भारतीय जनता पक्षाची (BJP) कमान नवीन अध्यक्षाच्या हाती दिली जाणार असल्याची चर्चा हलक्या आवाजात सुरू झाली आहे. नवीन अध्यक्ष म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे त्यात प्रथम क्रमांकावर आहेत हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Manoharlal Khattar). याशिवाय भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) हे सुध्दा अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. (BJP)
अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) शेवटच्या टप्प्यासाठी आज सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 57 जागांवर मतदान होत आहे. यानंतर 4 जूनला मतमोजणी होणार आहे. भारतीय जनता पक्षाला चारशेपेक्षा जास्त जागा मिळण्याची आशा आहे. तर, इंडी आघाडीलाही मुसंडी मारण्याची अपेक्षा आहे. (BJP)
लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election 2024) आणि सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होताच भारतीय जनता पक्षाची कमान (BJP) नवीन अध्यक्षाच्या हाती देण्याची तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) भारतीय जनता पक्षात मोठा फेरबदल करणार आहेत. (BJP)
भाजपाध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांचा कार्यकाळ सहा महिन्यांपूर्वीच संपला होता. मात्र, लोकसभा निवडणूक संपेपर्यंत त्यांचा कार्यकाळ वाढविण्यात आला होता. आता केंद्र सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवीन अध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता आहे. (BJP)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : पुढील ३ दिवस अंदाज आणि अनुमानांचे !)
भाजपाच्या (BJP) अध्यक्षपदासाठी सध्या दोन नावे सर्वाधिक चर्चेत आहेत. यात पहिले नाव आहे ते हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Manoharlal Khattar) यांचे आहे. तर दुसरे नाव भूपेद्र यादव (Bhupendra Yadav) यांचे आहे. गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) हे सुध्दा पुन्हा पक्षाची कमान आपल्या हाती घेवू शकतात. याशिवाय, अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा मराठी माणसाच्या हातात जावू शकते अशीही एक चर्चा आहे. (BJP)
मात्र, नवीन अध्यक्षाची निवड ब—यापैकी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे. भाजपाला (BJP) स्वबळावर 300 जागा मिळाल्या तर पक्षाची कमान मनोहर लाल खट्टर (Manoharlal Khattar) यांच्या हाती दिली जावू शकते. भाजपाला 270 किंवा त्यापेक्षा कमी जागा मिळाल्यातर भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांच्या नावाचा विचार होवू शकतो. आणि परिस्थिती फारच बिकट झाली तर पक्षाची कमान अमित शहा आपल्या हातात घेऊ शकतात. पण हे सर्व 4 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या निकालावर अवलंबून राहणार आहे. (BJP)
(हेही वाचा- Central Railway Mega Block: प्रवाशांचे ‘मेगा’हाल! दिवा स्थानकात रेल्वेचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न)
मनोहरलाल खट्टर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या फार जवळचे मानले जातात. भाजपाने (BJP) 300 चा गाठला तर खट्टर यांची निवड केली जाईल. परंतु 270 किंवा त्यापेक्षा कमी जागा आल्या तर भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांची निवड होईल. याचे कारण असे की, रालोआतील आताचे आणि आधीच्या घटक पक्षाशी बोलणी करायची झाली किंवा त्यांची समजूत काढायची झाली तर यासाठी मुत्सद्यीपणा अंगी असलेल्या नेत्याची गरज पडेल. भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) या कामात तरबेज आहेत. यामुळे ते प्रबळ दावेदार असतील. (BJP)
खट्टर यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून ते कर्नालमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. निवडणूक लढवणे हाही त्यांच्या रणनीतीचा एक भाग असू शकतो. निवडणुकीचे निकाल तुलनेने कमी असल्यास मध्यम मार्ग काढण्यासाठी भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांना बढती मिळू शकते. (BJP)
(हेही वाचा- June 2024: महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरपासून क्रेडिट कार्डपर्यंत ‘हे’ ५ मोठे बदल, जाणून घ्या)
भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याही जवळचे आहेत. भविष्यात आपल्या मर्जीनुसार निर्णय घेता यावेत यासाठी गेल्या काही काळापासून भाजपा (BJP) संघटनेतील वरिष्ठ नेत्यांनी आपल्या निकटवर्तीयांना बसवण्याचा प्रयत्न केला आहे. ही लोकसभा निवडणूक भाजपाच्या भविष्यातील राजकारणालाही बदल देणारी ठरणार आहे. (BJP)
सध्याच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपा (BJP) नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची उणीव भासत आहे. या निवडणुकीत गडकरींनी फारसा प्रचार केलेला नाही. आता सर्वांच्या नजरा नागपुरच्या निकालाकडे लागल्या आहेत. (BJP)
(हेही वाचा- Ministry of Defence: संरक्षण मंत्रालयाने खासगी शस्रास्त्रे बनवणाऱ्या कंपन्यांना दिला इशारा, वाचा सविस्तर)
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 जूनच्या सायंकाळपर्यंत कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये तपश्चर्येत तल्लीन राहतील. दिल्लीत परतल्यावर साहजिकच ते निवडणुकीचा आढावा घेतील आणि त्यानंतर संघटनेबाबतही चर्चा करतील. कारण आजच्या परिस्थितीत पक्षावर त्यांची पूर्ण पकड आहे. एकही प्रश्न न विचारता संपूर्ण संघटनाही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. (BJP)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community