परकीय गुंतवणुकीत यंदा महाराष्ट्राने पहिला क्रमांक मिळवला, Devendra Fadnavis यांनी दिली आकडेवारी

२०२१ -२२ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात १,१४, कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली आहे.

178
Devendra Fadnavis: परकीय गुंतवणुकीत यंदा महाराष्ट्राने पहिला क्रमांक मिळवला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
Devendra Fadnavis: परकीय गुंतवणुकीत यंदा महाराष्ट्राने पहिला क्रमांक मिळवला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवून नेल्याची टीका सातत्याने होत असतानाच परकीय गुंतवणुकीत यंदा महाराष्ट्राने पहिला क्रमांक मिळवला असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सरलेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात सर्वाधिक १,२५,१०१ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ती ६,६७९ कोटी रुपयांनी अधिक असून महाराष्ट्र पुन्हा देशात पहिल्या क्रमांकावर आला असल्याचे फडणवीस म्हणाले.

२०२१ -२२ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात १,१४, कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली आहे. आथिक वर्ष २०२२-२३ मध्ये ही गुंतवणूक वाढून १,१८,४२२ कोटी रुपये आणि २०२३- २४ मध्ये १,२५,१०१ कोटी रुपये झाली. तसेच गेल्या सन २०१९ ते २०२४ या कालावधीत राज्यात एकूण ५,३२,४२८.७४ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली आहे.

(हेही वाचा – Sevagram Express: मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेसचे १२ कोच वातानुकूलित, कारण? घ्या जाणून)

गुजरातपेक्षा दुप्पट गुंतवणूक
या आर्थिक वर्षातील गुंतवणूक गुजरातमध्ये मिळालेल्या एकूण गुंतवणुकीच्या दुप्पट व दुसऱ्या क्रमांकावरील गुजरात व तिसऱ्या क्रमांकावरील कर्नाटकच्या एकत्रित बेरीजपेक्षा जास्त आहे, असा दावा फडणवीसांनी केला. मविआ सरकारच्या काळात गुंतवणूक आकर्षित करण्यात मागे राहिलेल्या महाराष्ट्राने पुन्हा सलग २ वर्षे प्रथम क्रमांक पटकावला आहे, अशा शब्दांत ठाकरे सरकारवरही टीकास्त्र सोडले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.