Milk Rate: दुधाच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची घसरण…

4442
Milk Rate: दुधाच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची घसरण...

राज्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे. ग्रामीण भागाला याचा मोठा फटका बसला असून, यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्याला यांचा मोठा धक्का बसला आहे. उन्हामुळे दुधाच्या दरात (Milk Rate) तीस टक्क्यांपर्यंत घट झाली. पाणी टंचाई, चाऱ्याचा प्रश्‍न, पशुखाद्याचे (animal feed) वाढते दर यामुळे दूध उत्पादक मेटाकुटीला आलेला असताना काही दिवसांपूर्वी दोन रुपये वाढवलेले गाईच्या दुधाचे दर बहुतांश दूध संघांनी पुन्हा दोन रुपयांनी कमी केले आहे. त्यामुळे ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाचा प्रति लिटरचा २९ रुपयांचा दर पुन्हा २७ रुपयांवर आला आहे. (Milk Rate)

(हेही वाचा – Sevagram Express: मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेसचे १२ कोच वातानुकूलित, कारण? घ्या जाणून)

दोन रुपये दर कमी केल्यापासून दूध उत्पादकांना दर दिवसाला तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक तर शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार ३४ रुपये दर दिला जात नसल्याने प्रति लिटरला सात रुपयांप्रमाणे दररोज १५ कोटी रुपयांपेक्षा आर्थिक फटका बसत असल्याने दूध उत्पादक पुरते हैराण झाले आहे.

वाढत्या उष्णतेमुळे बहुतांश भागात पाण्याची टंचाई आहे. यांचा थेट परिणाम दूध व्यवसायावर होताना दिसत आहे. अहमदनगरसह उन्हाळ्यात लग्नसोहळे व अन्य कार्यक्रमामुळे दुग्धजन्य पदार्थाला मागणी अधिक असते. असे असताना दर कमी केल्याने शेतकरी बेजार झाले आहेत. या उष्मामुळे साधारणपणे तीस ते चाळीस लाख लिटरपर्यंत दुधात घट झाली आहे. 

(हेही वाचा – Devendra Fadnavis: परकीय गुंतवणुकीत यंदा महाराष्ट्राने पहिला क्रमांक मिळवला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा)

राज्यात गाईच्या दुधाचे साधारणपणे दोन ते सव्वादोन कोटी लिटरपर्यंत संकलन होत असते. साधारणपणे कमी पाणी उपलब्धता असलेल्या भागातील शेतकरी शेतीला जोड म्हणून दूध व्यवसाय करतात. अहमदनगरसह नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा, विदर्भासह अन्य भागांत तीव्र उन्हाळा असल्याने व उष्माची तीव्रता अधिक आहे.

दुधाच्या उत्पादनात ३० ते ४० लाख लिटरपर्यंत घट

दुध उत्पादकांना (Milk producer) दररोज तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान होत असल्याने आणि शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारसीप्रमाणे ३४ रुपये प्रति लिटर दर न मिळाल्याने संकट वाढले आहे. राज्यात दररोज साधारणपणे दोन ते सव्वादोन कोटी लिटर दूध उत्पादन होते. परंतु आता उन्हाळ्यात जानवणारी पाण्याची टंचाई आणि तीव्र उष्णतेमुळे दूध उत्पादनात ३० ते ४० लाख लिटरपर्यंत घट झाली आहे. (Milk Rate)

हेही पाहा –  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.