दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या अंतरिम जामीन अर्जावर न्यायालयाने निर्णय दिलेला नाही. या याचिकेवर ५ जून रोजी निर्णय होणार आहे. हे पाहता केजरीवाल यांना ०२ जून रोजी तिहार तुरुंगात (Tihar Jail) जाऊन आत्मसमर्पण करावे लागणार आहे. खरेतर, न्यायालयाने निवडणूक प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांची १० मे रोजी २१ दिवसांच्या अंतरिम जामिनावर सुटका केली होती. त्याच्या जामिनाची मुदत २ जून रोजी संपत असून रविवारी अरविंद केजरीवाल यांना शरण जावे लागणार आहे. (CM Arvind Kejriwal)
(हेही वाचा – ख्रिस्ती धर्माचा प्रसार करून धर्मांतर करणाऱ्या पाद्रीने स्वीकारला Hindu Dharm)
मात्र, तत्पूर्वी, केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी आपली खराब प्रकृती आणि वैद्यकीय चाचणीचे कारण देत अंतरिम जामीन आणखी ७ दिवस वाढवण्याची विनंती केली आहे. या याचिकेवर शनिवारी न्यायालयात सुनावणी झाली. केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाच्या मुदतवाढीला ईडीने विरोध केला. केजरीवाल यांच्या बाजूने एन हरिहरन कोर्टात हजर झाले आणि एएसजी एसव्ही राजू हे तपास यंत्रणा ईडीतर्फे हजर झाले होते. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता (Solicitor General Tushar Mehta) हेही ऑनलाइन सुनावणीसाठी उपस्थित होते. त्यांनी असा युक्तिवाद केला की, शुक्रवारी केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन २ जून रोजी आत्मसमर्पण करणार असल्याचे सांगितले होते.
(हेही वाचा – Indi Alliance च्या बैठकीला कोणते नेते उपस्थित आणि कोणते अनुपस्थित?)
न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहू असे त्यांनी सांगितले नाही. अशी विधाने करून ते न्यायालयाची दिशाभूल करत आहेत. दोन्ही बाजूंचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर राऊस एव्हेन्यूच्या विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी सुनावणी पूर्ण झाल्याचे सांगितले. आता अंतरिम जामिनावर न्यायालय ५ जून रोजी निकाल देणार आहे. (CM Arvind Kejriwal)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community