- वंदना बर्वे
देशातील अन्य राज्ये ज्या पद्धतीने दिल्लीत स्वत:ची मार्केटिंग आणि लायजनिंग करताना दिसतात; त्या तुलनेत महाराष्ट्राचे प्रयत्न नगण्य स्वरूपाचे असल्याची खंत दिल्लीतील मराठी ब्युरोक्रेटकडून व्यक्त केली जायची. मात्र, मागील वर्षापासून महाराष्ट्र सरकारने सुद्धा स्वत:ची मार्केटिंग करण्यात वेग पकडला असल्याचे दिसून येत आहे. (CM Eknath Shinde)
देशाची राजधानी या नात्याने दिल्लीकडे राजकारणाचे केंद्रस्थान म्हणून बघितले जाते. परंतु, दिल्ली म्हणजे केवळ राजकारण नसून जागतिक घडामोडींचे केंद्र सुध्दा आहे. राष्ट्रपती भवन, देशाची संसद, केंद्र सरकारची विविध मंत्रालये, सर्वोच्च न्यायालय, विविध आयोग आणि संयुक्त राष्ट्र संघ, जागतिक आरोग्य संघटना यासारख्या मोठमोठ्या संस्थाचे मुख्यालय दिल्लीत आहेत. (CM Eknath Shinde)
(हेही वाचा – मनुस्मृती पेटवली Jitendra Awhad यांनी मात्र, भडका उडाला NCP च्या मंत्र्यांमध्ये)
यामुळे, राज्यांना केंद्र सरकारकडून निधी मिळविण्यापासून ते विविध कामाची परवानगी घेण्यासाठी दिल्लीत यावे लागते. याच कारणामुळे देशातील सर्वच राज्यांनी दिल्लीत मिनी सचिवालय उघडले आहे. यास निवासी आयुक्तालय म्हणतात. या कार्यालयामार्फत राज्यांच्यावतीने प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जातो. दिल्लीत महाराष्ट्राचे सुध्दा एक निवासी आयुक्तालय आहे. या कार्यालयामार्फत शासकीय कामकाजाचा पाठपुरावा केला जातो. (CM Eknath Shinde)
संसदेच्या प्रत्येक अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यांतील सर्व खासदारांची एक बैठक बोलावितात. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयाकडे महाराष्ट्राशी संबधित जे प्रश्न प्रलंबित आहेत त्याची एक यादी पुस्तकस्वरूपात दिली जाते. सर्वपक्षांच्या खासदारांनी हे प्रश्न संसदेत उचलावेत आणि प्रश्न निकाली काढावेत हा या बैठकीमागचा हेतू असतो. परंतु, अन्य राज्यांचे सरकार ज्या पध्दतीनं दिल्लीतील विविध संस्थांमध्ये स्वत:ची मार्केटिंग आणि लायजनिंगचे काम करते तसे महाराष्ट्र सरकार करीत नसल्याचे आतापर्यंत दिसून येत होते. (CM Eknath Shinde)
(हेही वाचा – Indi Alliance च्या बैठकीला कोणते नेते उपस्थित आणि कोणते अनुपस्थित?)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ‘मॅंगो डिप्लोमॅसी’ चा वापर करून राज्याची मार्केटिंग करायला सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारच्या विविध मंत्रालयामध्ये उच्च पदावरील अधिकारी, दोन्ही सरकारमधील मराठी आयएएस अधिकारी, अन्य राज्यांच्या कॅडरमध्ये असलेले मराठी आयएएस अधिकारी, जागतिक संस्थांमध्ये कार्यरत अधिकारी या सर्वांच्या भेटी घेऊन त्यांना ‘अल्फांसो’ आंब्याची पेटी भेट स्वरूपात दिली जात आहे. (CM Eknath Shinde)
मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे विविध देशांच्या प्रतिनिधींचा संबध महाराष्ट्राशी येतो. अशात, दिल्लीतील राजदूत आणि कॉंसिल जनरलच्या भेटी घेतल्या जात आहेत. त्यांनाही महाराष्ट्राची भेट म्हणून ‘अल्फांसो’ची पेटी दिली जात आहे. यात जर्मनीचे राजदूत फिलिप आकेरमान, स्वीडनचे राजदूत जान थ्स्लेफ, ब्राझीलचे राजदूत केनेथ फेलिक्स, मेक्सिकोचे राजदूत फ्रेडरिक सेल्स, चिलीचे राजदूत जुआन अनुगुलो, नॉर्वेचे राजदूत मे-लीन स्टेनर, डेन्मार्कचे राजदूत फ्रेडी स्वाने, क्रोएशियाचे राजदूत पिटर ल्युबकिक, एस्टोनियाच्या राजदूत मार्जे ल्युप, आस्ट्रियाचे राजदूत कॅथरिन वायजर, रवांडाच्या राजदूत कुकांगिरा जॅकलीन, तुकीचे राजदूत फिरत सुनेल आणि फिनलॅंडचे राजदूत किम्मो लाडेविरटा यांचा समावेश आहे. (CM Eknath Shinde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community