Hindutva : आता हिंदुत्व हाच ध्यास आणि श्वास; सेवानिवृत्तीनंतर राजेंद्र वराडकर यांनी व्यक्त केल्या भावना

मागील ३६ वर्षे राजेंद्र वराडकर भारतीय रेल्वेमध्ये सेवारत होते. त्याच वेळी ४० वर्षांपासून हिंदुत्वाचे कार्यही अविरतपणे करत आहेत. शुक्रवार, ३१ मे रोजी राजेंद्र वराडकर भारतीय रेल्वेतून सेवानिवृत्त झाले, विशेष म्हणजे याच दिवशी राजेंद्र वराडकर यांना ६० वर्षे पूर्ण होऊन त्यांनी ६१व्या वर्षी पदार्पण केले.

311

तरुण वयापासून मी हिंदुत्वाचे (Hindutva) कार्य करत आहे. माझ्या या कार्याला आईचा पाठिंबा होता, ती नेहमी मला हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करायची, तिच्यामुळेच माझ्या मनावर हिंदुत्वाचे संस्कार झाले आहेत. तर माझे वडील सतत इतरांना मदत करायचे. अडल्या नडलेल्यांना मदत करून त्यांचा मार्ग सुकर करायचे, इतरांना निरपेक्ष भावनेने मदत करावी हा संस्कार माझ्यावर वडिलांमुळेच झाला आहे. आई-वडिलांच्या संस्काराने मी घडत गेलो आणि आज जेव्हा सेवानिवृत्त झालो, तेव्हा त्याच संस्काराने मी माझे जीवन जगत आहे. नोकरी करत असतानाही हिंदुत्वाचे (Hindutva)   कार्य करत होतो आणि आता सेवानिवृत्त झालो आहे, त्यामुळे वेळेची उपलब्धता पूर्ण असणार आहे, तेव्हा यापुढे हिंदुत्व हाच ध्यास आणि हाच श्वास असेल, अशा भावना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केल्या.

varadkar1

(हेही वाचा Swatantra Veer Savarkar Jayanti : विविध शहरांमध्ये साजरी झाली स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती)

हिंदुत्वासाठी अविरत कार्यरत 

राजेंद्र वराडकर हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तळमळीने कार्यरत असतात. समाजातील प्रत्येक घटकाला आणि हिंदुत्वाचे (Hindutva) कार्य करणाऱ्या अधिकाधिक संघटनांना वीर सावरकरांचे विचार समजावेत, वीर सावरकर यांना अभिप्रेत असलेले राष्ट्र निर्माण करण्यासाठी नव्या पिढीने हिरीरीने समोर यावे, यासाठी राजेंद्र वराडकर कायम कार्यरत असतात. मागील ३६ वर्षे राजेंद्र वराडकर भारतीय रेल्वेमध्ये सेवारत होते. त्याच वेळी ४० वर्षांपासून हिंदुत्वाचे कार्यही अविरतपणे करत आहेत. शुक्रवार, ३१ मे रोजी राजेंद्र वराडकर भारतीय रेल्वेतून सेवानिवृत्त झाले, विशेष म्हणजे याच दिवशी राजेंद्र वराडकर यांना ६० वर्षे पूर्ण होऊन त्यांनी ६१व्या वर्षी पदार्पण केले. कार्यालयातील कर्मचारी आणि सहकारी यांनी त्यांना फेटा बांधून हार घालून त्यांचा सत्कार केला. कार्यालयाच्या मुख्य द्वारापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढली. एका बाजूला नोकरीच्या ठिकाणी मिळवलेले प्रेम घेऊन बाहेर पडलेले वराडकर हिंदुत्वाच्या कार्याची कर्मभूमी म्हणून मानत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये उपस्थित पदाधिकारी, सहकारी आणि कर्मचारी वर्गानेही त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला आणि हिंदुत्वाचे कार्य पुढे आणखीन जोमाने करण्यासाठी मनोमन शुभकामना दिल्या.

आता हिंदुत्वाचे कार्य जोमाने करणार 

मी नोकरी करत असतानाही हिंदुत्वाचे (Hindutva) कार्य करायचो, म्हणून मला कायम मर्यादा यायच्या. काही वेळा उघडपणे मला समोर येता येत नव्हते, परंतु आता मी सेवानिवृत्त झालो आहे, आता माझ्यावर कसले बंधन नाही. त्यामुळे मी यापुढे उघडपणे हिंदुत्वाचे कार्य करेन, याचे मला समाधान वाटते. मी जसा मी नोकरीच्या ठिकाणी प्रामाणिक राहिलो तसाच मी हिंदुत्वाच्या कार्याशी, वीर सावरकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याच्या कार्याशी प्रामाणिक राहिलो. हिंदुत्वाचे कार्य करताना कधी मी श्रेयाची अपेक्षा केली नाही किंवा आपण केल्याच्या कार्याचा गवगवा केला नाही. माझ्या वडिलांकडून हा गुण माझ्यात आला. माझ्या वडिलांनी अनेकांना नोकरी लावून दिली, ते प्रत्येकाला मदत करायचे, कुणी अडचणीत असेल तर त्यांना सहाय्य करायचे. त्याप्रमाणे मीदेखील कायम अडल्या नडलेल्यांना मदत करतो, हा माझा स्थायीभाव आहे. अडचणीत सापडलेला तो त्यातून बाहेर पडावा आणि त्याचा मार्ग सुकर व्हावा, इतकाच उद्देश. पण त्यानंतर त्याला केलेल्या मदतीचा कधी उच्चार केला नाही. पडद्यामागे राहून अनेक मोठी कार्ये तडीस नेली. आता शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्वाचे (Hindutva) कार्य करणार, निवृत्तीनंतर मिळालेला सर्व वेळ या कार्यासाठी देणार, अडचण एकच असेल नुकत्याच झालेल्या ह्रदयाच्या शस्त्रक्रियेमुळे थोडीशी शारीरिक मर्यादा येईल, पण उत्साह कायम असणार आहे, असे राजेंद्र वराडकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.