Cm Eknath Shinde यांचा नाना पटोलेंवर पलटवार, म्हणाले- मी फक्त… 

244
Cm Eknath Shinde यांचा नाना पटोलेंवर पलटवार, म्हणाले- मी फक्त… 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) तीन दिवसाच्या सुट्टीवर सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या (Satara Dare Gaon) गावी गेले. यावेळी शेतीची पाहणी करतानाचा व्हिडिओ ट्विट करत परदेशी कशाला जायचं, गड्या आपला गाव बरा, असा टोला उबाठा गटाचे गटप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला होता. त्याच अनुषंगाने बोलताना नाना पटोलेंनी (Nana Patole) मुख्यमंत्र्यांना खोचक सल्ला दिला आहे. एकनाथ शिंदेंना नजीकच्या काळात शेतीच करायची आहे. पण, मुख्यमंत्री असल्याचं भान ठेवून सध्या त्यांनी दुष्काळग्रस्त भागात दौरा करावा, असे पटोले यांनी म्हटले होते. यावर पलटवार करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी काम करणारा कार्यकर्ता आहे. साताऱ्यातील दरे गावात मी फक्त विश्रांती घेत नाही. तर मी माझ्या गावात जनता दरबार आयोजित केला आहे. ज्यामध्ये सातारा आणि आसपासच्या जिल्ह्यातील लोक मला भेटायला आले होते. असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.   (Cm Eknath Shinde)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: इंडी आघाडीला २९५ पेक्षा जास्त जागा मिळतील मल्लिकार्जुन खरगेंचा दावा!)

मुख्यमंत्री म्हणाले की, मी २९ मे रोजी माझ्या गावी आलो. यानंतर मी बुलढाणा आणि अहमदनगरमध्येही गेलो होतो. जनतेच्या कामसंबंधीत मी थेट जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना फोन करतो. तसेच अधिकारीही माझ्यासोबत राहतात. त्यामुळे लोकांची कामे होतात. असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच नाना पटोले हे विरोधी गटात आहेत त्यामुळे विरोधी पक्षात असल्याने त्यांना सरकारवर टीका करावी लागते. पण पटोले यांनाही माझ्या कामाची चांगलीच माहिती आहे. असा टोला ही मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.   

(हेही वाचा – Coal Ministry : देशात विजेची प्रचंड मागणी, तरी औष्णिक प्रकल्पांमध्ये पुरेसा कोळसा साठा उपलब्ध)

पटोले म्हणाले होते की, दुष्काळग्रस्त भागात लोक दु:खाने मरत आहेत. मुख्यमंत्री, राज्याचे कृषिमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांना मी सतत मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही पालकमंत्र्यांचे फोन लागले नाहीत. (Cm Eknath Shinde)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.