IND vs BAN: टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर कशी असेल? रोहित शर्मा म्हणाला…

184
IND vs BAN: टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर कशी असेल? रोहित शर्मा म्हणाला...
IND vs BAN: टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर कशी असेल? रोहित शर्मा म्हणाला...

टीम इंडियाने रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वात एकमेव आणि अखेरच्या सराव सामन्यात बांगलादेशवर (IND vs BAN) टी 20 वर्ल्ड कप 2024 () स्पर्धेच्या एक दिवसआधी 60 धावांनी शानदार विजय मिळवला. टीम इंडियाने बांगलादेशसमोर 183 धावांचं आव्हान ठेवलं होतं. बांगलादेशला या विजयी धावांचा पाठलाग करताना 9 विकेट्स गमावून 122 धावांपर्यंतच पोहचता आलं. (IND vs BAN)

बॅटिंग ऑर्डर मुख्य सामन्यातही अशीच असेल का?

टीम इंडियाकडून (IND vs BAN) अर्शदीप सिंह आणि शिवम दुबे या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. त्याआधी या सराव सामन्यात टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये नेहमीपेक्षा बदल पाहायला मिळाले. यशस्वी-शुबमनऐवजी संजू सॅमसन ओपनिंगला आला. तर ऋषभ पंत तिसऱ्या स्थानी बॅटिंगला आला. त्यामुळे टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर मुख्य सामन्यातही अशीच असेल का? असा प्रश्न रोहितला सामन्यानंतर विचारण्यात आला. रोहितने (Rohit Sharma) यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. तसेच सामन्याबाबतही प्रतिक्रिया दिली. (IND vs BAN)

रोहित शर्मा काय म्हणाला ?

“ज्या गोष्टी घडल्या त्याबद्दल खूप आनंद झाला आहे. खेळातून आम्हाला जे हवं होतं ते मिळालं. परिस्थितीचा उपयोग करुन घेणं महत्त्वाचं आहे”, असं रोहितने म्हटलं. तसेच या सामन्यात ऋषभ पंतने टीम इंडियासाठी (IND vs BAN) सर्वाधिक 53 धावांची खेळी केली. रोहितने याबाबत प्रतिक्रिया देताना बॅटिंग ऑर्डरवर भाष्य केलं. पंतला फक्त संधी देण्यासाठी तिसऱ्या स्थानी पाठवल्याचं रोहितने म्हटलं. तसेच “आम्ही अजून बॅटिंग ऑर्डर निश्चित केलेली नाही. आम्हाला बहुतेकांना मिडल ऑर्डरमध्ये संधी मिळावी, अशी अपेक्षा होती. तसेच आमच्याकडे 15 खेळाडू आहेत. परिस्थितीनुसार सर्वोत्तम खेळाडू निवडण्याची गरज आहे.” असं रोहितने स्पष्ट केलं. (IND vs BAN)

टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), ऋषभ पंत (विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.