उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी (Mumbai Rain) आनंदवार्ता आहे. मुंबईकर पावसाची वाट पाहत असतानाच हवामान खात्याने पावसाच्या आगमनाची तारिख सांगितली आहे. हवामान अभ्यासकांनी मुंबईत 4-5 जून रोजी पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पावसाच्या आगमनानंतर मुंबईकरांना उकाड्यापासुन दिलासा मिळेल. (Mumbai Rain)
(हेही वाचा –IND vs BAN: टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर कशी असेल? रोहित शर्मा म्हणाला…)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत 4-5 जूनपर्यंत मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. तरी मुंबईत (Mumbai Rain) 6 ते 13 जूनपर्यंत चांगला पाऊस अपेक्षित आहे. यंदा मुंबईमध्ये पावसाचं आगमन वेळेवर होणार असून त्याचं प्रमाणंही चांगलं असण्याची शक्यता आहे. पावसाची (Mumbai Rain) प्रगती योग्य गतीने सुरू असून त्यामुळे मुंबईत पाऊस वेळेवर येणार असल्याचा अंदाज आहे. 10 जूनपर्यंत मुंबईच्या कमाल तापमानात सातत्याने घट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 10 जून रोजी तापमान 31 अंशांवर पोहोचेल. (Mumbai Rain)
(हेही वाचा –Delegation Russia visit : निकाल लागताच सर्वपक्षीय नेत्यांचे वऱ्हाड निघालं रशियाला..)
हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाणे, रविवार आणि सोमवारी किमान तापमान 28 अंश सेल्सिअसवर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. IMD च्या अंदाजानुसार, मंगळवार आणि बुधवारी तापमान 27 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. गुरुवार ते शनिवारपर्यंत किमान तापमान 27 ते 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. पुढील आठवड्यात ढगाळ आकाश आणि वातावरणातील धुकं राहण्याचा अंदाज आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Mumbai Rain)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community