Vitthal Mandir : तब्बल ७९ दिवसांनंतर विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमली भाविकांची मांदियाळी

146
Vitthal Mandir : तब्बल ७९ दिवसांनंतर विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमली भाविकांची मांदियाळी
Vitthal Mandir : तब्बल ७९ दिवसांनंतर विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमली भाविकांची मांदियाळी

तब्बल 79 दिवसानंतर पुन्हा एकदा विठुरायाच्या (Vitthal Mandir) पायावरील दर्शनास 2 जूनपासून सुरुवात झाली आहे. विठुरायाच्या चरणस्पर्श दर्शनास सुरुवात झाल्याने आषाढी एकादशीप्रमाणेच पंढरपुरात गर्दी दिसून आली. देवाचं देखणं रूप पाहण्यासाठी काल रात्री 8 वाजल्यापासूनच हजारो भाविकांनी गर्दी केली होती.तासन् तास या ठिकाणी उभे राहून भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर झाले होते. (Vitthal Mandir)

(हेही वाचा –MP Boat Capsized: सीप नदीमध्ये बोट उलटून एकाच कुटुंबातील ७ जण ठार, कसा झाला अपघात? वाचा सविस्तर)

आज सकाळी साधारण 6 वाजल्या पासून भाविकांच्या दर्शनाला सुरुवात झालेली पाहायला मिळाली. या दरम्यान भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. तसेच, लहान मुलांसग अबाल वृद्ध देखील या रांगेत उभे होते. या ठिकाणी जमलेल्या भाविकांना (Vitthal Mandir) पावसाचे साकडे घालायचे होते, भीषण पाणीटंचाई दूर व्हावी तसेच महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हाला असं साकडं घालायचं होतं.शेतकऱ्यांवरील सुकाळ येऊ दे आणि राजकारण्यांवर दुष्काळ येऊ दे अशीही मागणी देवाकडे मागणार असल्याचे एका भाविकाने सांगितले. बऱ्याच दिवसांनंतर देवाचं दर्शन झाल्याने भाविकांच्याही चेहऱ्यावर प्रसन्नतेचा भाव होता. (Vitthal Mandir)

(हेही वाचा –Mumbai Rain: मुंबईमध्ये कधी होणार पावसाचं आगमन? हवामान खात्याने तारिख सांगितली…)

मंदिर संवर्धन कामामुळे 15 मार्च पासून देवाच्या पायावरील दर्शन बंद करून केवळ पहाटे सहा ते सकाळी अकरा इतकाच वेळ भाविकांना मुखदर्शन व्यवस्था ठेवली होती. आता गाभारा चौखांबी आणि सोळखांबी येथील कामे पूर्ण होत आल्याने आता भाविकांना 2 जूनपासून थेट पायावर दर्शन करता येणार आहे. (Vitthal Mandir)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.