Lok Sabha Exit Poll 2024: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या जागा घसरणार? एक्झिट पोल काय साांगतो?

236
Lok Sabha Exit Poll 2024: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या जागा घसरणार? एक्झिट पोल काय साांगतो?
Lok Sabha Exit Poll 2024: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या जागा घसरणार? एक्झिट पोल काय साांगतो?

देशातील सात टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Exit Poll 2024) मतदान पार पडलं आहे. एक्झिट पोलचे (Lok Sabha Exit Poll 2024) अंदाज समोर आले आहेत. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजपला देशभरात विविध राज्यात मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) देखील एक्झिट पोलचा अंदाज या प्रमाण आहे. पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या (TMC) जागा घटण्याची शक्यता आहे. तर, भाजपच्या जागा वाढण्याचा अंदाज आहे. (Lok Sabha Exit Poll 2024)

टीएमसीला मोठा धक्का?

पश्चिम बंगालमधील 42 जागांसाठी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. आकडेवारीनुसार, भाजप (BJP) प्रणित एनडीएला (NDA) 23 ते 27 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, तृणमूल काँग्रेसला 13-17 जागा मिळू शकतात. इंडी आघाडीला 1-3 जागांवर यश मिळू शकतं. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोलचे (Lok Sabha Exit Poll 2024) अंदाज आणि 2014 आणि 2019 च्या निवडणूक निकालांची तुलना केल्यास यावेळी टीएमसीला मोठा धक्का बसू शकतो. टीएमसीला 2019 च्या निवडणुकीत 12 जागांचा फटका बसला होता. तर भाजपच्या जागा वाढल्या होत्या. 2019 ला भाजपच्या 16 जागा वाढल्या होत्या. (Lok Sabha Exit Poll 2024)

(हेही वाचा –Lok Sabha Election 2024: चंद्रकांत पाटलांनी फेटाळले एक्झिट पोल्सचे अंदाज, सेफॉलॉजीचा संदर्भ देत म्हणाले…)

2014 मध्ये टीएमसीला 34 जागा मिळाल्या होत्या. तर, 2019 मध्ये टीएमसीला 22 जागा मिळाल्या होत्या. आता 2024 मध्ये टीएमसीच्या जागा घटण्याची शक्यता आहे. टीएमसीला 13-17 जागा मिळू शकतात. भाजपला 2014 लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये 2 जागांवर विजय मिळवला होता.2019 ला भाजपला लोकसभा निवडणुकीत 18 जागा मिळाल्या होत्या. 2014 ते 2019 मध्ये भाजप 2 जागांवरुन पश्चिम बंगालमध्ये 18 जागांवर पोहोचला होता. भाजपनं गेल्या दोन निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये मोठं यश मिळवलं आहे. आता या निवडणुकीत टीएमसीला धक्का देत भाजप यश मिळवणार का हे पाहावं लागेल. याशिवाय देशात पुन्हा एकदा भाजप प्रणित एनडीएचं सरकार येण्याची शक्यता एक्झिट पोलच्या अंदाजात वर्तवण्यात आला आहे. (Lok Sabha Exit Poll 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.