Lok Sabha Election 2024: वर्षा गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, भाजपाने केलेल्या ‘या’ तक्रारीची निवडणूक आयोगाने घेतली दखल

निवडणूक प्रचारात उज्ज्वल निकम दलित विरुद्ध असल्याचा प्रचार केल्याचा आरोप भाजपा पदाधिकारी शरद कांबळे यांनी वर्षा गायकवाड यांच्यावर केला आहे.

295
Lok Sabha Exit Poll 2024: वर्षा गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, भाजपाने केलेल्या 'या' तक्रारीची निवडणूक आयोगाने घेतली दखल

महाविकास आघाडीच्या मुंबई उत्तर-मध्यमधील उमेदवार आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भाजपाकडून त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. उज्ज्वल निकम यांच्याविरोधात वर्षा गायकवाड यांनी खोटा प्रचार केला, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे.  (Lok Sabha ा2024)

उज्ज्वल निकम दलित विरुद्ध असल्याचा प्रचार केल्याचा आरोप भाजपाचे पदाधिकारी शरद कांबळे यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. (Lok Sabha Exit Poll 2024)

निवडणूक प्रचारात उज्ज्वल निकम दलित विरुद्ध असल्याचा प्रचार केल्याचा आरोप भाजपा पदाधिकारी शरद कांबळे यांनी वर्षा गायकवाड यांच्यावर केला आहे. त्यांच्या तक्रारीची निवडणूक आयोग आणि पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. आता पोलिसांनी शरद कांबळे यांना निर्मल नगर पोलिसांनी त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी बोलावले आहे. मुंबई उत्तर-मध्यमध्ये महायुतीकडून उज्वल निकम वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उभे होते, मात्र लोकसभेचा निकाल ऐन २ दिवसांवर आलेला असताना आता वर्षा गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र आहे.

(हेही वाचा – Nanded: खळबळजनक ! नांदेडमध्ये ३९१ मशीन गनचे राऊंड सापडले; कसा लागला शोध?)

महाविकास आघाडीतील जागा वाटपात मुंबई उत्तर-मध्य हा लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसच्या वाट्याला आला होता. यामध्ये कॉंग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात भाजपाने पूनम महाजन यांचे तिकीट डावलून उज्ज्वल निकम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.