कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणी (Karnataka sex scandal case) आरोपी प्रज्वल रेवण्णाला ३१ मे रोजी बंगुळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रज्वल रेवण्णावर (Prajwal Revanna) कर्नाटकमधील अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. प्रज्वल रेवण्णा एसआयटीला तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती समोर आली आहे. (Karnataka sex scandal case)
सेक्स स्कँडल प्रकरणी (Karnataka sex scandal case) आरोपी प्रज्वल रेवण्णा हा एसआयटीच्या प्रश्नांना टाळत असून तपासात सहकार्य करत नाही, असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. एसआयटीचे पथक आरोपी प्रज्वल रेवण्णाला आज किंवा सोमवारी घटनास्थळी नेवून तपास करण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना प्रज्वल रेवण्णाने एसआयटीच्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरं दिली. तसंच हा माझ्याविरुद्ध कट रचला असून आपण काहीही चुकीचं केलं नसल्याचं प्रज्वल रेवण्णाचं म्हणणं आहे. (Karnataka sex scandal case)
(हेही वाचा –Lok Sabha Election 2024: एक्झिट पोलमध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार; सर्वेक्षणात कोणाला बहुमत?)
दरम्यान, या प्रकरणात प्रज्वल रेवण्णाच्या आईचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. मात्र, त्या चौकशीसाठी हजर झाल्या नाहीत. तसेच त्यांच्या निवासस्थानी जाऊन पोलिलांनी चौकशी केली असता त्या तिथे दिसुन आल्या नाहीत. त्यामुळे आता भवानी रेवण्णा (Bhavani Revanna) यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी चौकशी टाळली तर एसआयटीकडून त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. (Karnataka sex scandal case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community