Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशात भाजपाला मोठं यश! भाजपाला एकहाती सत्ता मिळवून देणारे कोण आहेत पेमा खांडू ?

209
Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशात भाजपाला मोठं यश! भाजपाला एकहाती सत्ता मिळवून देणारे कोण आहेत पेमा खांडू ?
Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशात भाजपाला मोठं यश! भाजपाला एकहाती सत्ता मिळवून देणारे कोण आहेत पेमा खांडू ?

अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh ) आणि सिक्कीम विधानसभा (Sikkim Assembly Election Result) निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरु आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपनं (BJP) एकहाती सत्ता मिळवली आहे. सिक्कीम विधानसभा निवडणुकीत सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं (SKM) सलग दुसऱ्यांदा विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरु ठेवली आहे. (Arunachal Pradesh )

भाजपची पुन्हा निर्विवाद बहुमताकडे दमदार वाटचाल

अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh ) भाजप पुन्हा निर्विवाद बहुमताकडे दमदार वाटचाल करत आहे. भाजपने ही निवडणूक मुख्यमंत्री पेमा खांडू (Pema Khandu) यांच्या नेतृत्वाखाली लढवली. पेमा खांडू यांनी स्वत:सह दहा जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आणल्या होत्या. यंदा भाजप 2019 पेक्षाही चांगली कामगिरी करताना दिसत आहे. 2019 मध्ये भाजपने 41 जागा जिंकल्या होत्या. आता हा आकडा 47 पर्यंत पोहचला आहे. कधीकाळी काँग्रेसमध्ये राहिलेले पेमा खांडू प्रथम 2016 मध्ये मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2019 भाजपच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून शानदार विजय मिळवून दिला. आता तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री बनणार आहे. (Arunachal Pradesh )

कोण आहेत पेमा खांडू?

21 ऑगस्ट 1979 मध्ये जन्मलेले पेमा खांडू यांचे कुटुंब राजकारणात होते. त्यांचे वडील दोरजी खांडू राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते मोनपा जनजातीतून येतात. दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर 2000 मध्ये काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम केले. प्रथम 30 जून 2011 रोजी ते बिनविरोध निवडून आले. त्यानंतर त्यांचा अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh ) मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉलसारख्या खेळांमध्ये पेमा खंडू यांना आवड होती. त्यामुळे राजकारणात आल्यानंतर त्यांनी खेळाला प्राधान्य देत अनेक योजना आणल्या. 2014 मध्ये मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये त्यांना शहर विकास मंत्री करण्यात आले. त्यानंतर ऑक्टोंबर महिन्यात नाराज नेता कलिखो पूल यांची साथ देत पद सोडले.खांडू यांनी काँग्रेसमध्ये बंड पुकारले. आता 2024 मध्ये पेमा खांडू तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. (Arunachal Pradesh )

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.