Koyna Dam क्षेत्रात पाण्याची चिंता नाही; 15 जुलैपर्यंत पुरणार पाणीसाठा

Koyna Dam मध्ये 12.46 इतका निव्वळ पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या पायथा वीजगृहातील दोन युनिटमधून वीजनिर्मिती करून 2100 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू आहे.

158
Koyna Dam क्षेत्रात पाण्याची चिंता नाही; 15 जुलैपर्यंत पुरणार पाणीसाठा
Koyna Dam क्षेत्रात पाण्याची चिंता नाही; 15 जुलैपर्यंत पुरणार पाणीसाठा

कोयना धरणाच्या (Koyna Dam) नवीन तांत्रिक वर्षाला शनिवार, 1 जूनपासून प्रारंभ झाला आहे. या दिवशी कोयना धरणावर पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सध्या तीव्र उन्हाळ्यातही धरणात एकूण 17.58 टीएमसी (16.70 टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातील 5.12 टीएमसी पाणीसाठा हा मृत मानला जातो. त्यामुळे 12.46 इतका निव्वळ पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या पायथा वीजगृहातील दोन युनिटमधून वीजनिर्मिती करून 2100 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू आहे.

(हेही वाचा – Pune Porsche Accident : ‘बाळा’च्या आई-वडिलांची कोठडी वाढली!)

दुष्काळी भागाला मोठा दिलासा

कोयना धरणाचे 1 जून ते 31 मे हे तांत्रिक वर्ष असते. कृष्णा पाणीवाटप तंटा (Krishna Water Dispute) लवादानुसार 1 जूनपासून 67.5 टीएमसी एवढा पाणीसाठा पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी आरक्षित होतो. उर्वरित पाणीसाठा हा पूर्वेकडील सिंचन आणि पिण्यासाठी दिला जातो. धरण व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन हे अनेकदा यशस्वी ठरले आहे. मागील वर्षी देखील मे महिन्याच्या अखेरपर्यंत धरणात 17 टीएमसी पाणी शिल्लक होते. त्या तुलनेत यंदा केवळ अर्धा टीएमसी पाणी कमी आहे. महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरणामुळे यंदा पूर्वेकडील दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळाला आहे.

पाणीसाठा 15 जुलैपर्यंत पुरेल

कोयना धरणात शनिवार, 1 जून रोजी सकाळी 8 वाजता एकूण 17.58 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. तज्ञांच्या मते, पाऊस लांबला, तरी कोयना धरणातील सध्याचा पाणीसाठा 15 जुलैपर्यंत पुरेल. त्यामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याची चिंता नाही. वीजनिर्मितीवर देखील परिणाम होणार नाही, अशी माहिती कोयना धरणाचे अधीक्षक अभियंता नितीश पोतदार यांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.