देशातील काही मतदारसंघ प्रचंड चर्चेत आहेत. एक्झिट पोलमध्ये एनडीएला ३५० ते ४०० जागा मिळतील, असा दावा करण्यात आल्या आहेत. चर्चेत राहिलेल्या मतदारसंघांमध्ये अभिनेत्री कंगना रणौत उभ्या असलेला हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघ, देशद्रोहाचे आरोप असलेला कन्हैया कुमार उभा असलेला उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघ, तिहेरी लढत असलेला सांगली लोकसभा मतदारसंघ (Loksabha Election 2024) यांचा समावेश आहे.
(हेही वाचा – Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशात भाजपाला मोठं यश! भाजपाला एकहाती सत्ता मिळवून देणारे कोण आहेत पेमा खांडू ?)
मंडी लोकसभा मतदारसंघ
हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघात अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांच्यात लढत होत आहे. अटीतटीच्या होत असलेल्या या लढतीमध्ये एक्झिट पोलने कंगनाला झुकते माप दिले आहे.
उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघ
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये या वेळी आप आणि काँग्रेस यांची लढत झाली. भाजपाचे मनोज तिवारी आणि काँग्रेसकडून देशद्रोहाचे आरोप असलेला कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांच्यात येथे थेट लढत झाली. आता एक्झिट पोलमधील अंदाजानुसार या मतदारसंघात मनोज तिवारी हे आघाडीवर असल्याचे संकेत मिळत आहेत.
पुरी लोकसभा मतदारसंघ
या वेळी ओडिशामध्ये भाजपा मोठी आघाडी घेईल, असे संकेत एक्झिट पोलमधून मिळत आहेत. दरम्यान, ओदिशामधील पुरी लोकसभा मतदारसंघात भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) आणि बीजू जनता दलाचे अनुप पटनाईक यांच्यात थेट लढत झाली. एक्झिट पोलमध्ये संबित पात्रा यांना झुकते माप मिळाले आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघ
महाराष्ट्रातील सांगली लोकसभा मतदारसंघातील लढतही या वेळी लक्षवेधी ठरली. येथे भाजपचे संजयकाका पाटील, उबाठा गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष निवडणूक लढवत असलेले काँग्रेसचे विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये विशाल पाटील हे मुसंडी मारतांना दिसत आहेत.
तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघ
केरळमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला मिळणाऱ्या मतांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान केरळमधील तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते शशी थरूर (Shashi Tharoor) आणि भाजपाचे उमेदवार राजीव चंद्रशेखर यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाली होती. एक्झिट पोलनुसार या मतदारसंघात राजीव चंद्रशेखर यांचे पारडं जड राहण्याची शक्यता आहे. (Loksabha Election 2024)
हेही पहा –