Legislative Assembly Elections : अरुणाचल प्रदेशात भाजपला स्पष्ट बहुमत; सिक्कीममध्ये एकतर्फी निकाल

Legislative Assembly Elections : अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला (BJP) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. राज्यात 19 एप्रिल रोजी झालेल्या मतदानानंतर रविवार, २ जून रोजी मतमोजणी करण्यात आली.

219
Legislative Assembly Elections : अरुणाचल प्रदेशात भाजपला स्पष्ट बहुमत; सिक्कीममध्ये एकतर्फी निकाल
Legislative Assembly Elections : अरुणाचल प्रदेशात भाजपला स्पष्ट बहुमत; सिक्कीममध्ये एकतर्फी निकाल

अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) आणि सिक्कीम (Sikkim) राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला (BJP) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. राज्यात 19 एप्रिल रोजी झालेल्या मतदानानंतर रविवार, २ जून रोजी मतमोजणी करण्यात आली. यात भाजपने आतापर्यंत 34 जागांवर विजय मिळवला आहे. (Legislative Assembly Elections)

(हेही वाचा – Loksabha Election 2024 : देशभरातील गाजलेल्या मतदारसंघांविषयी काय आहेत एक्झिट पोलचे अंदाज ?)

अरुणाचल प्रदेश विधानसभेतील ६० जागांपैकी तब्बल ४६ जागांवर भाजपाने कब्जा केला आहे. यापूर्वी १० जागांवर भाजपाने बिनविरोध विजय मिळवला होता. त्यामुळे 50 जागांवर मतदान झाले. अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने 34 जागा जिंकल्या असून 11 जागांवर आघाडीवर आहे. देशातील सर्वांत जुना पक्ष काँग्रेस अद्याप आपले खातेही उघडू शकलेला नाही आणि केवळ एका जागेवर आघाडीवर आहे.

एनपीपीने दोन जागा जिंकल्या आहेत, पीपीएने दोन जागा जिंकल्या आहेत आणि एका अपक्ष उमेदवाराने एक जागा जिंकली आहे. दरम्यान अरुणाचल प्रदेशातील लोकसभेच्या दोन जागांसाठी 4 जून रोजीच मतमोजणी होणार आहे. ३ जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गट तिसऱ्या क्रमांकावर राहिला, हे यंदाचे विशेष आहे.

सिक्कीममध्ये प्रादेशिक पक्षांना पसंती

सिक्कीममध्येही विधानसभा निवडणुकीचा एकतर्फी निकाल लागला आहे. येथे सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने विधानसभेतील ३२ पैकी ३१ जागा जिंकल्या आहेत. तर एसडीएफला केवळ एक जागा मिळाली. तर भाजपाला सिक्कीममध्ये खातंही उघडता आलं नाही. (Legislative Assembly Elections)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.