लोकसभा २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या सातही टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून, येत्या ४ जून रोजी या मतदानाचे निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान यावेळी विविध संस्था आणि माध्यमांद्वारे ‘एक्झिट पोल’चे (Exit Poll) आकडे समोर आले आहेत. यात एनडीए सत्तेत येऊ शकते असा अंदाज वर्तवला येत आहे. दरम्यान, उबाठा गटाचे गटप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत शिवसेनेच्या एका मंत्र्याने मोठा गौप्य स्फोट केला आहे. (Deepak Kesarkar)
हिंदुत्वाच्या आधारे मतदान मागणारे उबाठा गटाचे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीची साथ सोडून, महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे त्यांच्या खोट्या हिंदुत्वावर चौफेर बाजूने टीका करण्यात येत आहे. अशातच शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या बद्दल एक मोठं गौप्यस्फोट केलं आहे. यामध्ये “निवडणुकी आधी उद्धव ठाकरे यांनी मोदी साहेबांच्या भेटीसाठी वेळ मागितली होती. पण, त्यांना ती वेळ मिळू शकली नाही, असा मोठा गौप्यस्फोट मंत्री दीपक केसरकर यांनी केला. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तिगत बोलले आहेत त्यावरुन ते त्यांना माफ करतील का नाही हे सांगता येत नाही. कारण नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तिगत महाराष्ट्रामध्येच बोलले आहेत, असंही दीपक केसरकर म्हणाले.
(हेही वाचा – पतीला भ्रष्टाचार करण्यापासून न रोखणे पत्नीचा दोष; High Court ने सुनावली १ वर्षांची शिक्षा)
मागील काही दिवसापासून उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना भेटण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ठाकरे यांना एनडीए (NDA) मध्ये यायचे आहे, यासाठी ते विविध लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत मेसेज पाठवत आहे, असा दावा मंत्री दीपक केसरकर (Minister Deepak Kesarkar) यांनी एका वृत्त वाहिनीसोबत बोलताना केला आहे. या बातमीमुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. (Deepak Kesarkar)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community