३६ तासांचा mega block घेऊन CSMT आणि Thane स्थानकावर करण्यात आले ‘हे’ काम

192
३६ तासांचा mega block घेऊन CSMT आणि Thane स्थानकावर करण्यात आले 'हे' काम
३६ तासांचा mega block घेऊन CSMT आणि Thane स्थानकावर करण्यात आले 'हे' काम

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव, यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संबंधित विभागांच्या पाठिंब्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (EI) चालू करण्याचे प्रचंड काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे, ज्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १० आणि १1 च्या विस्तारासाठी आणि प्लॅटफॉर्म ५ आणि ६ च्या रुंदीकरणासाठी सर्व प्रवाशांचा प्रवास सुरळीत होईल.

(हेही वाचा – Pune Porsche Car Accident : आता ससूनमध्ये रक्तासह आराेपींच्या लघवीचेही नमुने घेतले जाणार ?)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म क्रमांक १० आणि ११ ची ३८५ मीटरने वाढ केल्यानंतर, लांबी ६९० मीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे आणि आता २४ डब्यांच्या प्रवासी गाड्या बसू शकतात. १.६.२०२४ च्या ००.३० ते दि. २.६.२०२४ च्या १२.३० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-भायखळा मेन लाईन आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वडाळा रोड हार्बर लाईन विभागावर काम करण्यासाठी ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात आला.

या कामामध्ये टर्नआउट्सचे एकत्रीकरण, मांडणी आणि विघटन, ओव्हर हेड इक्विपमेंट (ओएचई) पोर्टल्सची उभारणी यासह सर्व १०लाईन कव्हर करणारे ५३ मीटरचे २ विशेष पोर्टल उभारणे समाविष्ट होते. हे भारतीय रेल्वेवर पहिल्यांदाच घडले आहे. प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याबरोबरच पॉइंट्स, सिग्नल्स, डीसी ट्रॅक सर्किट आणि इतर तांत्रिक कामेही करण्यात आली.

ठाणे स्थानकावर ५/६ चे १x१x१ मीटर, ०.५x१x१ मीटर आणि १.५x१x१ मीटरचे ७८५ प्रीकास्ट होलो ब्लॉक्स बसवून ५८७ मीटरच्या संपूर्ण लांबीसाठी २-३ मीटरने रुंदीकरण करण्यात आले.  प्लॅटफॉर्मच्या बांधकामासाठी अशा प्रकारच्या ब्लॉक्सचा वापर पहिल्यांदाच झाला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.