मुंबईत पश्चिम मार्गावरील (Western Railway) बोरिवली स्थानकात (Boriwali Station) तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी सकाळी लोकल सेवा विस्कळीत झाली. ओव्हरहेड वायरमधील बिघाडामुळे उशीर झाल्याची प्राथमिक माहिती रेल्वेने ‘X’ वर दिली आहे. सर्व धीम्या मार्गावरील उपनगरीय गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. (Mumbai Local Train Update)
(हेही वाचा – Jitendra Awhad यांच्याकडून सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान)
ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे बोरिवलीतील फलाट क्रमांक १ आणि २ वरील सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे जलदगतीच्या गाड्या उशिराने धावत आहेत. बोरिवली स्थानकामध्ये सध्या ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरू आहे. परंतु सकाळी ०७ वाजण्याच्या दरम्यान प्रवाशांचा खोळंबा झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. (Mumbai Local Train Update)
Due to some technical issues of cable being cut, point no 107/108, point no 111/112 & point no 131/132 are not operational currently therefore Suburban trains not being operated from platform nos 1 & 2 of Borivali Station.
Trains are being operated from platform nos…
— Western Railway (@WesternRly) June 3, 2024
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community